Marathi Suvichar

Marathi Suvichar

मराठी सुविचार (Marathi Suvichar)

विचाराचा पाया भक्कम नसलेल्या माणसाच्या जीवनाची इमारत उभी राहू शकत नाही. जीवन जगताना सोबतीला फक्त विचार नसावेत. त्यामुळे ते विचार सुंदर असावे लागतात. चांगले विचार मानवाला प्रेरणा देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनतात.

हा उत्तम मराठी सुविचार संग्रह नक्की वाचा.

Marathi Suvichar

लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
मित्र वाढले नाहीत तरी चालेल पण शत्रूची वाढ तरी करू नका.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
या जगात माणसाची नाही
त्याच्या पैशांची किंमत असते…
घराची योग्यता व्यवस्था हीच घराची शोभा, संतुष्टता हीच घराची लक्ष्मी, समाधान हेच घराचे वैभव ,धार्मिकता हाच घराचा कळस ,अतिथ्य हेच घराचे सुख.
नेहमी तत्पर रहा,
बेसावध आयुष्य जगू नका.
या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
खरं बोलून कोणाला दुखावलं
तरी चालेल पण
खोट बोलून
कोणाला सुख देऊ नका.
माणूस हा काणत्याही धर्माचा नसून तो प्रथम माणूस असतो.माणुसकीने वागणे हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे.म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…
बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
जगात तीच लोकं पुढे जातात
जे सूर्याला जागे करतात आणि
तीच लोकं पाठीमागे राहतात
ज्यांना सूर्य जागं करतो…
फांद्या तोडून झाड मरत नाही, घर सोडून माया तुटत नाही आणि वेष बदलून स्वभाव पालटत नाही, आसक्ती मुळापासून तोडावी लागते.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
कलयुग नाही
मतलबी
युग चालू आहे…
या भुतलावर, दानासारखा दुसरा धर्म नाही, लोभासारखा दुसरा शत्रू नाही, सौजन्यासारखे दुसरे भूषण नाही. आणि संतोषाएवढे धन नाही.
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो.
जे बोलायचं आहे ते
सरळ तोंडावर बोला,
पाठीमागून तर कुत्रे
सुद्धा भुंकत असतात…
माणूस व्हा
साधू नाही झालात तरी चालेल,
संत ही नाही झालात तरी चालेल,
पण माणूस व्हा माणूस…
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तके

आणि दुसरी भेटलेली माणसे…
क्षमेसारखे तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही, दयेपेक्षा मोठा धर्म नाही.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ.. कारण
तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी
पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
सर्व उत्तरे पण भेटतील
आणि हिशोब पण
फक्त माझी वेळ येऊद्या…
मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळतेच.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
चिता मेलेत्या माणसांना जाळते तर चिंता जिवंत माणसांना जाळत राहते.
जर माणसाला गलिच्छ आणि
घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते
तर गलिच्छ आणि घाणेरड्या
विचारांची लाज का वाटू नये ?
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
प्रीतीची वेल, धर्माचं कुंपण मानीत नाही.
त्या शिक्षणाचा काय उपयोग जे
शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात,
अन तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली माणस उचलतात..
चरित्र हाच खरा इतिहास असतो.
आई आणि बायको दोघींची
कदर करा… कारण एकीने
तुम्हाला या दुनियेत आणल आणि
दूसरी सारी दुनिया सोडून
तुमच्या जवळ आलिये…
सहमत असाल तर शेयर कराच.
अचूकता पाहिजे असेल तर सराव महत्त्वाचा आहे.
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
नेहमी माणस म्हणतात की स्त्रिया
कधीच आपल खर वय सांगत नाहीत.
पण अस आहे की त्यांना आपल्या
वयाचा खरा हिशोब लावता येत नाही.
कारण त्या स्वतःसाठी खूप कमी
जगलेल्या असतात.
कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
खूप हुशारी पेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.
नांव तर सगळेच लोक ठेवतात
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रॉड
करता आला पाहिजे…
जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
दुःख त्याच व्यक्तीला भेटते
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…
मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन आहे.
थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे.
किस्मत को
बेकार बोलने वालों…
कभी किसी गरीब के पास बैठकर
पूछना
जिंदगी क्या है..
गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
दृष्टिकोण हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
जख्म कहां कहां से मिले है,
छोड़ इन बातो को…
जिंदगी तु तो ये बता,
सफर कितना बाकी है…!!
संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.
आपलं दुःख पाहुन कोणी
हसले तरी चालेल,
पण आपल हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता कामा नये.
शहाण्याला शब्दांचा मार असतो.
प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही.

मराठी उखाणे

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock