अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज ज्यांनी माणसाला स्वतःमध्ये ईश्वर शोधण्यास सांगितले, त्यांना भगवान श्री दत्त यांचे तिसरे अवतार मानले जाते. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी’ हे वाक्य वाचून आणि ऐकूनही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.
भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांचा सदैव संकटातून उद्धार होतो, कर्म केल्याचे फळ कधी ना कधी येतेच, अशी श्रद्धा भाविकांची आहे. असे मानले जाते की कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यावर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात ठेवल्यास जीवनाचे सार्थक नक्कीच होते.
चला आपल्या जीवनासाठी स्वामी समर्थांचे प्रेरणादायी अवतरण पाहू.
Swami Samarth Quotes in Marathi
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा.
जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो.
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी.
तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही.
ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.
खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.
प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका.
ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. मी आहे ना तुझ्या पाठिशी. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे – पुढे चालतो. संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात, सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. तू कर मत फिक्र, जो हुआ नही, मैं करूंगा वो जो तूने सोचाही नहीं. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा! असं म्हणतात की, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी …भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. संकटं तुमच्यातली शक्ती आणि जिद्ध पाहण्यासाठीच येत असतात. समाधानी राहा – सुखी व्हाल. भक्ती करा मुक्ती मिळेल. प्रार्थना करा प्रगती होईल. ध्यान करा ज्ञान मिळेल. ‘मी’पणा सोडा मोठे व्हाल. कला शिका अमर व्हाल. सहाय्य करा सोबत मिळेल. व्यवसन सोडा शांती मिळेल. त्याग करा आत्मानंद मिळेल. दान करा धन मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्रम करा सुख मिळेल. मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठिशी आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते. निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते. तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे ही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. विश्वास ठेव…अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींंवर निःशंक सोपवा. कर्म करता राहा. फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील. नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास, डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन.