He never experienced childhood

त्यांनी बालपण अनुभवलच नाही | He Never Experienced Childhood

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

He Never Experienced Childhood

दुपारचं ऊन कधी डोक्यावर घेतलं नाही,

पावसात चिंब कधी भिजलाच नाही,

भूक लागेपर्यंत कधी खेळला नाही,

आईचा मार कधी खाल्लाच नाही,

मी म्हणतो

त्यानं बालपण अनुभवलच नाही.

आंबट बोरे गाभुळी चिंच माहीत नाही,

पाडाचा आंबा ठाऊकच नाही,

मधाच पोळ आठवत नाही,

निरस्या दुधाची चव माहीतच नाही,

मी म्हणतो

त्यानं बालपण अनुभवलच नाही

सुरपारंब्या खेळला नाही,

आटयापाट्या माहीतच नाही,

सागरगोटे, गोट्या आवडत नाही

उन्हातले खेळ कधी खेळलाच नाही

मी म्हणतो

त्यानं बालपण अनुभवलच नाही.

शाळा बुडवून खेळायला गेला नाही,

गुरुजींचा मार खाल्लाच नाही,

खापरी पाटी फुटली नाही,

गूर्जीची माया अनुभवलीच नाही,

मी म्हणतो

त्यानं बालपण अनुभवलच नाही.

बालपण होत आमचं कसं,

पैश्यान कमी पण माणुसकीन मोठं.

आर माणसामाणसात तर होताच,

पण गाईगुरात पण होता जिव्हाळा.

ज्यांना यातलं काहीच माहीत नाही.

मी म्हणतो

त्यानं बालपण अनुभवलच नाही.

मी म्हणतो

त्यानं बालपण अनुभवलच नाही.

धन्यवाद

ज्याचं वय सध्या ४० च्या पुढे आहे अशा माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना ही कविता समर्पित.

कविता आवडल्यास नक्की कळवा.

©भुषण कौशल्या लक्ष्मण मडके

Share त्यांनी बालपण अनुभवलच नाही|He never experienced childhood

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock