पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
(All of a sudden…)
आज अचानक आलेल्या लहरीमुळे
घर स्वच्छ झाडले कचरा होता किरकोळ
पण मला एकच विचाराने पछाडले…
आज अचानक या लहरीने दिले होते जाणवून…
घराच्या त्या चौसष्ट फरश्या बोलावत होत्या खूनवून…
झाडता झाडता त्या फर्श्यांसोबत मैत्री झाली घट्ट…
त्या सांगत होत्या त्यांची दास्तान मी ऐकत होतो फक्त…
बोलता बोलता विषय आमचा झाला थोडा गंभीर…
झाडूने ही मारली उडी मग अगदीच होऊन अधीर…
त्या म्हणाल्या खिन्न हसून, “इतक्या दिवसात आज का आठवण आली”…
देत दुजोरा फरशिला मग झाडू त्याच्याच तोऱ्यात बोलला
ईस भिडू को तो अपून ने पेहली बारीच देखा…
मी मात्र शांत होतो कारण माझीच मला लाज वाटली…
जाणीव झाली मला चुकीची,मग केला एक वायदा…
रोज नाही जमणार पण, रविवारचा केला कायदा…
क्षणभर हसून फरशी हळूच बोलली झाडुला…
मैत्री केली आपण आणि झाला आपलाच फायदा…
मग काय खुश होतो तिघेही मारल्या भरपूर गप्पा…
एकमेकांच्या हातात हात घालून धुळीला दिला धप्पा…
मग काय फरशी मी आणि झाडू अशी मैफिल रंगली…
तेवढ्यात आली बायको मग आमची शांतताच भंगली…
पुन्हा भेटू म्हणून तिघेही पांगलो…
मी मात्र कधी न केलेल्या घरकामातच गुंगलो…
आता होते भेट नेहमी ठरल्या प्रमाणे मस्त…
नसत कोणी आडवणारे, मग कल्ला होतो स्वस्त…
कल्ला होतो स्वस्त…
-©अक्षय गोवारकर
One thought on “आज अचानक… | All of a sudden…”