Are You Leaving Bappa?

निघालास बाप्पा | Are You Leaving Bappa?

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Are You Leaving Bappa?

चल.. आवराआवर कर

जाता जाता जमलंच तर

मला थोडं लहान कर

मागे वळून बघायचंय

मला थोडं जगायचंय

निसटलेल्या आनंदाला

पुन्हा एकदा अनुभवायचंय

फुलपाखरं पतंग भोवरा गोट्या

हेच तर सगळं विश्व होतं

छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद

असं काहीसं चित्र होतं

आता मोठ्या गोष्टी देखील

छोटा पण आनंद देत नाहीत

लाख जुळवून घ्यावं तरी

मनं पूर्ण जुळत नाहीत

आताशा स्पर्धेत धावतांना

धावणंच फक्त जाणवतं

हाती काहीच लागत नाही

सारं.. फक्त उणावतं

करिअर प्रमोशन गाडी बंगला

यातून बाहेर पडायचंय

मॅनर्स एटिकेट्स फेकून देऊन

पुन्हा मनमोकळं जगायचंय

उरलेल्या आयुष्यात सरलेलं

आयुष्य पुन्हा जगायचंय

जमलं तर प्लीज बाप्पा

एवढं तुला करायचंय

माहित आहे तुझ्याकडे

रिवाईंडचं बटन नाही

पण तुला मनातलं बोलल्याशिवाय

मला देखील राहवत नाही !

गणपती बाप्पा मोरया …पुढच्या वर्षी लवकर या…

निघालास बाप्पा | Are You Leaving Bappa? हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

निघालास बाप्पा | Are You Leaving Bappa? – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO