Ashya Ya Reshim Gathi

अशा या रेशीम गाठी | Ashya Ya Reshim Gathi

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

सुप्रभाती मन रोज जातसे त्या कृष्णाकाठी
कशा कधि आणि कुणि बांधल्या या रेशीमगाठी

दरी खोऱ्यातील बिकट ति वाट
जीवन अवघे डोंगर घाट
नैराश्य मेघ भवति घनदाट
सावरिले संकटी सख्यांनी धरूनिया हाती

प्रपौत्र दोन ते अवती भवति
बोल तयांचे मला सुखविती
भासे मज किती जन्मांची नाती
नकळे मजला धावत येऊनि
गळा घालिती मिठी

रास रंगीली गोकुळीं पुनवेला
गोप गोपिका येथे रमल्या
आठवित परी हरी कुब्जेला
अपसुक वळले पाऊल हरीचे
कालिंदीच्या तटी

राम वियोगे भरत मनि झुरे
चरण प्रभूंचे क्षण न विसरे
अवचित राघव रूप सामोरे
उभय नयनी त्या आसू दाटले
धन्य भरतभेटी

पुष्पा पेंढरकर
08/04/2021

Share अशा या रेशीम गाठी – Ashya Ya Reshim Gathi Kavita

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock