पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Chimi
आमच्या असंख्य मित्रान पैकी एक अवलि मित्र म्हणजे केदार.
ह्या केदार ला लहानपणा पासुनच मुक़्या जनावरान बद्दल प्रेम.
आणि विशेष प्रेम आकर्षण प्राणी- कुत्रा.
त्यामुळे सहाजिकच त्याच्या घरी कुत्रा होता. त्याच्याच वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या बाबा ने गिफ्ट दिलेला ‘चिमी’. चिमी (Chimi) च केदार शिवाय आणि केदार च चिमी (Chimi) शिवाय पान हलत नसे. केदार ला जर कधी बर नसल की हा चपळ सदा एक्टिव असणारा चिमी एकदम मलूल होऊन जायचा. कधी केदार ला त्याची बहीण काही कारणा वरुन ओरडली तर चिमीला जरा सुद्धा खपत नसे लगेच भो भो करून घर डोक्यावर घेत पुढे पुढे तर चिमी (Chimi) साठी तिने केदार ला ओरडायचे सुद्धा बन्द केले.फक्त केदार च्या आई पुढे त्याचे काही चालत नसे.
ती कधी कधी केदार ला मुद्दाम ओरडत की बाघुया चिमी (Chimi) काय करतो तर हा खिड़कीत किवा बालकनी त जाऊंन खालून येणाऱ्या जाणारयां लोकां वर भूंकत बसे. केदार कामावर गेला की दिवस भर केदार च्या आई व बहीणी च्या मागे मागे शान्त पणे घुटमळत पण संध्याकाळी ऑफिसहुन केदार सोसायटी च्या आत एंटर झाला न झाला की हा सोफ्या वरुन खुर्ची वर खुर्चीवरुन कॉट वर नुसता उड्या मारत .
केदार टॉप फ्लोर ला राहायला पण खाली गेटपाशी आला की चिमी सुटलाच…. मग कोणाला आवारत नसे,केदार घराच्याआत येण्या आधीच त्याच्याकडे झेप घेत.मग पुढचा तास भर केदार त्याच्याशी ऑफिस मधे काय काय केल हे त्याला सांगत,गप्पा मारतआणि तो ही भो भो करत त्याला साथ देत.
जेवण आटोपली की दोघ खाली नाक्यपर्यंत एक राउंड मारून येत मग घरी आल की केदार थोड़ा वेळ लैपटॉप वर ऑफिस च काम करत आणि हा त्यामधे आपल्याला पण खुप समजतय अस भासवून शेपुट हलवत लॅपटॉप मधे बघत बसायचा.मग 11 वाजता केदार झोपायला जायाच्या आधी 10 मिनिट त्याचे पाय दाबून द्यायचा की मग स्वतः झोपायचा मग चिमी त्याच्या बाल्कनीतल्या जागेवर जाऊन झोपत पण रात्री एकदा तरी तो केदार च्या जवळ येऊन त्याला हूँगूंन त्याच्या पोटावर बसून परत आपल्या जागी जाऊन झोपत तर कधी केदारच्या पोटावरच झोपी जात.आणि केदार सुद्धा त्याची झोपमोड़ होऊ नये म्हणून तसाच सावधान अवस्थेत झोपत.
अशी दोघांची गट्टी.एवढा लळा ह्या दोघांनाएकमेकांचा लागलेला..
दिवसा मागून दिवस छान जात होते
एक दिवस केदार ऑफिसमधुन घरी आला आणि नेहमी प्रमाणे जेवणा अगोदर चिमी शी गप्पा मारत होता तसेच घरातल्यान बरोबर ही बोलत होता.बोलता बोलता चिमी ला क़ुरवाळत म्हणाला भुभुल्या चिमुल्या दोन दिवस हाफिसातल्या मित्राच्या लग्नाला त्याच्या गावी जाव लागतय रे फक्त दोन दिवस कळ काढ़ मि लागलीच लग्न लागल की जेउन निघणार अस म्हणाला.
किचन मधे असणारी आई व बहीण हे ऐकल्या वर लागलीच बाहेर आल्या व म्हणाल्या हे बघ केदार तुला जायचय ह्याला आमची ना नाही पण हे द्वाड तू दोन दिवस दिसला नाहीस तर किती त्रास देईल याची कल्पना सुद्धा करवत नाही तेव्हा तेजस म्हणाला आई…. तो बाबा आणि ताई ला दाद देत नाही पण तुझ ऐकतो तेव्हा जरा दोन दिवसाचा प्रश्न आहे घे न समजून मला ही ह्याला सोडून जायच जीवावर येतय पण इलाज नाही जाव तर लागणार.
हे त्याचे शब्द ऐकुन त्याच्या मांडी वर गुटमळ करून बसलेला चिमी (Chimi) लागलीच उठला आणि बाल्कनीत आपल्या जागेवर जाऊन बसला त्या दिवशी जेवला सुद्धा नाही. आणि तो जेवला नाही म्हणून केदार ही न जेवता झोपला.
बहुदा केदार दोन दिवसा साठी त्याच्या पासून लांब जाणार हे त्याला अवडल नसाव, म्हणून तो रुसला असावा असा सर्वांचा समज झाला होता कारण त्याला बोललेल सर्व कळायच.पण त्या दिवसा पासून चिमी (Chimi) खुप शांत झाला होता केदारच्या जाण्याचा विषय निघाला की जोरजोरात भूंकत रात्र रात्रभर विव्हळत रडत बसायचा त्याच्या वागणयात कमालीचा बदल झाला होता .
पण केदार दोन दिवस जाणार म्हणून रागवला असणार हीच एक समजूत सर्वांची झाली होती.
अखेर तो दिवस उजाडला केदार दुपारच्या 4 च्या गाडीने निघणार होता,तो आवरा आवर करत होता त्याची आई आणि बहीण bag भरत होत्या.केदार आणि त्याचे बाबा चिमीची समजूत काढत होते पण तो आज विचित्रच वागत होता नुसता रडत आणि भूंकत सुटला होता शेवटी निघायची वेळ आली तरी ह्याच रडण आणि भूंकण काही थाम्बेना म्हणून केदार त्याच्यावर कधी नव्हे ते ओरडला आणि घरातून बाहेर पडणार एवढ्यात चिमीने केदार च्या पायाचा जोरात चावा घेतला आणि धावत बाल्कनीत जाऊन त्याने खाली उडी मारली (6th फ्लोर वरुन)सगळ काही क्षणात घडल सर्व होत्याच नव्हतं झाल …… बस ह्या पुढील वर्णन माझ्याने होत नाहीये……
त्याने आपल जाण रहीत केल.आता पर्यंत रड़णार ते मूक जनावर कायमच शांत झाल होत. इथे घरातील लोकांना दुःख अनावर झाल होत केदार तर एखादा माणूस गेल्यासारखा हमसुन हमसुन रडत होता सगळे त्याला धीर देत होते रात्रि केदार ने सोसायटीच्यांच आवारातील गार्डन मधे त्याला दफन करून त्या जागी घरातील कुंडीतल जास्वन्दाच झाड़ त्या जागी आठवण म्हणून लावल. घरी आल्यावर स्नानादी आटपुन चिमीच्या वस्तु गोळा करत असताना त्याला एक फोन आला’.
तो …त्याच्या हेडऑफिस मधून त्याच्या वरिष्ठ अधिकारयांचा…की …केदार थोड्या वेळा पूर्वी पोलिस स्टेशन मधून फोन आलाय ज्या गाडीतुन तू जाणार होता त्या गाडीला अपघात झाला असून ड्रायव्हर सहीत सर्व जण मृत्युमुखी पडले आहेत. नशीब तुझ बलवत्तर म्हणून तू वाचलास अन्यथा……….. हे ऐकुन केदारच्या घरातील सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला. केदारच संकट त्याच्यावरील आलेल गंडांतर चिमी (Chimi) स्वतः वर घेऊन गेला होता… केदार डिप्रेशन मधे गेला त्याची नोकरी गेली.
ह्यातुन बाहेर पडायला केदार ला बराच काळ लागला परत नवीन सुरवात करायची म्हणून केदारची बहीण त्याच्या साठी प्रयत्न करत होती,त्याच्या साठी नोकरी शोधत होती केदार ही आता रोज मॉर्निंगवॉक ला बाहेर पड़त होता,संध्याकाळी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येत असता त्याला चिमी सारखा कुत्रा मंदिराच्या पायरीशी दिसत त्याला पाहुन केदार ही डिप्रेशन मधून बाहेर येत होता रोज केदार त्याला बिस्किट देत आणि तो त्याला गेट पर्यंत साथ देत मग परत दोघे आपल्या वाटेला अस रोजचा नियम झाला होता. एक दिवस केदारच्या बहिणीच्या ओळखित जॉब आला होता.
ती केदारला बरोबर घेऊन इंटरव्यूला जात होती. केदार ने वाटेत मंदिरापाशी गाड़ी थांबवली आणि खिशातुन पारले जी चा पुडा काढला आणि त्या पायरी जवळ बसलेल्या कुत्र्याला एक एक करत बिस्किट घालू लागला त्याची बहीण जरा भाम्बवलेल्या नजरेने त्याच्या कड़े बघत होती.तो आपला चिमी चिमी (Chimi) करत त्याला बिस्किट टाकत असता एकदम ओरडला तायड़े चि….मी… परत चावला ग पण तिथे कोणताच कुत्रा नव्हता तर हटकू कोणाला ….
त्याच्या बहिणीला काहीच उमगत नव्हतं. इंटरवयू ला जायचय आणि हा अजुन चिमी मधेच गुंतून बसलाय अजुन उशीर झाला तर लोकल ट्रेन चुकेल आणि हा जॉब ही जाईल म्हणून ती केदारला हाताशी धरून गाडीकडे घेऊन जात होती पण केदार ला त्या कुत्र्याच्या चाव्या चा त्रास होऊ लागला शेवटी वैतागुन तिने बड़बड़ करत त्याला घरी आणल अजूनही बड़बड़ चालू होती तिची
किती दिवस असा चिमीत अड़कुन राहणार आहेस, तो नाहीये आपल्यात का मानायला तयार होत नाहीस.
चिमीच्या आठवणीत स्वतः च्या आयुष्याच मातेर करत चाललाय वगैरे वगैरे बोलत होती आणि तेवढ्यात tv न्यूज़ चैनल वर एक बातमी झळकली ती ही…मुलुंड रेल्वे स्थानकात रेल्वे मधे बॉम्बस्फोट
केदार त्याच लोकल ने मुलुंड ला इंटरव्यू ला जाणार होता हे पाहून त्याची बहीण ढसा ढसा रडली आतून केदारने ही ची….मि म्हणत जोरात हम्बरडा फोड़ला आणि पुन्हा एकदा चिमी कुत्र्याच्या रुपात येऊन केदारवरील गंडांतर टाळून गेला..
–प्रथम वाडकर
चिमी | Chimi हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
चिमी | Chimi – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.