पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Happiness
गेले कित्येक दिवस निरोप देताना तिचे डोळे भरलेलेच असायचे. शिष्यवृत्ती मिळून हर्षद परदेशी गेला. श्वेता सैरभैर झाली. गेली वीस वर्षे तिचं जीवन हर्षदनंच व्यापलं होते. त्याचा विरह सहन करणं अशक्य होते. समजूत घालूनही ती खिन्नच असे. कौसल्या, जिजाबाई यांना पुत्रविरह तर सीता ऊर्मिला यांना पती विरहाचे दुःख, हे जाणूनही श्वेता सावरु शकत नव्हती. श्रीरंगही निराश होता.
अन् त्या दुपारी ‘आई ‘ म्हणत नाजूक हातांची बाळमिठी तिला जाणवली. ‘अगंबाई, हर्षू तू तर माझ्या जवळच आहेस’. धावतच तिनं कपाटातून कँनव्हास, रंग, ब्रश बाहेर काढले. हर्षदची किती तरी बालरुपे रंगसंगती साधून कँन्व्हास वर ऊतरली. चित्रकलेतील तिचं कौशल्य पुन्हा बहरून आलं होते. श्वेताला आयुष्यातील आनंद मिळाला होता. संध्याकाळी ऊत्साहानं तिनं श्रीरंगाचे स्वागत केले.
पुष्पा पेंढरकर
०४.१०.२०२२
आनंद | Happiness it हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
आनंद | Happiness – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.