पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Lokpriya Ganaytil Alakshit Nartaki
‘अनाडी’ अनेकदा बघितलाय. हृदय उचंबळून टाकणारे बरेच प्रसंग त्यात आहेत. ‘सब कुछ सीखा हमने’च्या वेळेचा प्रसंगही असाच आहे. ‘जिला आपण आपल्यासारखी गरीब समजत होतो, ती एका लक्ष्मीपुत्राची मुलगी आहे’, हा साक्षात्कार राज कपूरला होतो! हे गाणं पाहताना माझं सारं लक्ष असायचं नूतन, राज कपूर आणि शुभा खोटेच्या अभिनयाकडे, शैलेंद्रच्या शब्दांकडे आणि SJ च्या संगीताकडे! ‘आपल्या शैलीदार नृत्याचे बहारदार रंग भरुन, या गाण्याला अधिक सुंदर बनवणारी ही नर्तिका कोण?’ हा प्रश्न बरेच वर्षं मनात आला नव्हता. काही वर्षांनी अचानक एका मित्रानं तिचं नाव सांगितलं…’मीना फर्नांडिस !’
उंचापुरा आणि कमनीय बांधा, ग्रेसफुल हालचाली, पाणीदार डोळे आणि बोलका चेहरा! तिच्या नृत्याकडं फारसं बारकाईनं न पाहणारे आम्हीच ‘खरे अनाडी’ म्हणायचे. या ‘मीना’ च्या नशीबात आणखी एक All time great गाणं आलं होतं… बिमलदांच्या ‘सुजाता’ मधे! “तुम जियो हजारो साल…!” शशिकलाचा वाढदिवस.. आणि त्याचं ‘सेलिब्रेशन!’ कथानकात गुंतल्यामुळं आपलं सारं लक्ष असतं ‘नूतन’ कडे! ‘पार्टीतल्या’ सगळ्यांचं ‘नूतन’कडे दुर्लक्ष होतं, तसं प्रेक्षकांचं ‘मीना फर्नांडिस’कडे! बिमलदांनी या अजरामर गाण्याच्या ‘lip-sync’ चा मान चक्क या अलक्षित डान्सरला दिलाय!
‘अनाडी’ सारखाच, ‘जवळच्या व्यक्तीचं खरं रुप’ कळण्याचा प्रसंग ‘आवारा’मधे सुध्दा आहे. ‘नर्गिस’ला ‘राज’चं ‘लपवलेलं वास्तव’ समजतं तेव्हा! यावेळी लताचं अप्रतिम गाणं आहे… ‘इक बेवफासे प्यार किया!’ आणि या गाण्यावर नृत्य करणा-या नर्तिकेचं नाव आहे… ‘हनी ओ’ब्रायन !’ ती, प्रसिद्ध नर्तक ‘उदय शंकर’ यांच्या गृपमधे होती. ‘आवारा’चा ‘ड्रीम सिक्वेन्स’ उदयजींनी दिग्दर्शित करावा अशी राजची इच्छा होती. परंतु ते राजी झाले नाहीत. मात्र त्यांच्याच एका शिष्येनं ही जबाबदारी घेतली. आणि दुस-या शिष्येनं- हनी ओ’ब्रायननं – ‘इक बेवफासे’ या गाण्यात नृत्य केलं.
‘अनाडी’च्या गाण्यातली ‘मीना’ची ‘एंट्री’ पाहिली की ‘तेरे घरके सामने’ मधलं एक गाणं आठवतं… ‘दिलकी मंझील है कुछ ऐसी मंझील!’ या गाण्यात दोन नर्तिका आहेत. पहिलीचं नाव आहे ‘हेल्गा!’ ही जन्मानं जर्मन होती. सिनेसृष्टीत जम बसवण्यासाठी हिनं बरेच प्रयत्न केले पण दुर्दैवानं तिला यश मिळालं नाही. तिच्यासमवेत जी दुसरी डान्सर आहे ती ‘एडविना व्हायोलेट!’ ही एडवीना अनेक प्रसिद्ध गाण्यात दिसते. ‘अजीब दासतां है ये’ मधे ती शम्मीच्या मागं बसलेली दिसते. ‘अय्यय्या सुक्कू सुक्कू’ मधे पण ती आहे. पण एखादं अतीप्रसिध्द गाणं संपूर्णपणे तिच्यावर चित्रीत झालेलं मला माहिती नाही.
‘कमला लक्ष्मण‘ हे नाव दक्षिणेस सुविख्यात असलं तरी हिंदीत तिचं दर्शन अभावानंच घडतं. ‘कठपुतली’ मधल्या ‘हाए तू ही गया’ आणि ‘यहुदी’तल्या ‘दिलमें प्यार का तुफान’ या गाण्यातून तिची शास्त्रीय नृत्यावरची हुकूमत समजून येते.
केवळ एकाच गाण्यापुरती सिनेसृष्टीत अवतरलेली अभिनेत्री म्हणजे ‘एरिका लाल!’
‘आगे भी जाने न तू’ हे ‘वक्त’मधलं गाणं तिच्यावर पिक्चराईझ झालं होतं. तिला नर्तिका म्हणणं उचित नाही पण या गाण्यात तिनं मंद नृत्य केलंय. मुळातली हवाई सुंदरी असलेली एरिका पुनःश्च पडद्यावर अवतरली नसावी.
हिंदी सिनेसृष्टीतले असे बरेच ‘नर्तकी’ (Nartaki) आज काळाच्या ओघात विस्मरणात गेलेत. त्यांच्या कलेचं स्मरण करण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न.
सोबतच्या व्हीडीओत यातील काही गाण्यांच्या ‘झलकियाँ’ पाहता येतील.
संकल्पना व संकलन : धनंजय कुरणे
विशेष आभारः Kailash Mundra व Vilas Karambelkar
लोकप्रिय गाण्यातील अलक्षित नर्तकी! – Lokpriya Ganaytil Alakshit Nartaki Source
लोकप्रिय गाण्यातील अलक्षित नर्तकी! – Lokpriya Ganaytil Alakshit Nartaki हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
लोकप्रिय गाण्यातील अलक्षित नर्तकी! – Lokpriya Ganaytil Alakshit Nartaki – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
2 thoughts on “लोकप्रिय गाण्यातील अलक्षित नर्तकी! | Lokpriya Ganaytil Alakshit Nartaki”