पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Palna
अनुपमेय हे अमोल क्षण सौख्याचा
मम प्रपौत्र नामकरणाचा ।।धृ ।।
उजळला गृही दीपक नवीन पिढीचा
सुत भाग्यश्री प्रणवचा
तनय स्नुषा , तृप्त तुझ्या आगमनी
या प्रफूल्ल वातावरणी
पुष्पांच्या लेवुनी माळा
रंगीत पाळणा सजला
तुज साठीच रे लडिवाळा
मी वृद्धपणी , अमृतघटी अनुभविते
भाग्य कोणते या परते ? ।।१।।
तव गौर तनू कळी कि प्राजक्ताची
सीमा हि नाजूकतेची
अति मोहकसे सुहास्य वदनी विलसे
कि फुल उमलले साचे
इवलीशी हि जिवणी काही बोले
भाव अमल नायनामधले
बाळसखे जमले भवती
नाचती गाति किलबिलती
खेळून तुला खेळविती
हसुनीच तया देसी मुक्त प्रतिसाद
वाल्यांचा करुनि नाद ।।२।।
किती सुवासिनी आनंदे गीत गाती
शुभ औक्षण तुजला करिती
घ्या गोपाळा , घ्या ग कुणी गोविंद
चैतन्यब्रह्म आनंद
घ्या गजानना समर्थ स्वामी श्रीराम
या विश्वाचा विश्राम
पाळण्यात या जोजवू ओजस बाळा
रुणुझुणु वाजतो वाळा
आरोग्य आयु लाभावे
विद्याधन साध्य करावे
यश कीर्ती सहजी मिळवावे
कुलभूषण तू, ईशा घरचा ठेवा
प्राणाहून अधिक जपावा ।।३।।