पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
The sky is clear
नभ मोकळे झालेले , स्वप्नात पहिले मी
मनी मोहरून आले , हर्षात नाहले मी
अन जागृतीत येता , कळ लागली जिवा या
अंधारलेच नभ हि, तम व्यापितो जगा या
दारिद्रय , दुःख रूढी , भय रोग सतत जाळी
करी कोणी आत्महत्या , सति कोणी अश्रू ढाळी
महामारी वाट बघते , पसरून उभय बाहू
मज भूक आवरे ना , सांगा कुणास खाऊ?
मन का आज केले , निष्ठुर तू दयाळा?
घन वर्षवि कृपेचे , दे अभय डावी लीला
सारुनी तिमिर जाल , करी मोकळे आभाळ
उजळेल प्राचीवरती , रमणीय ती सकाळ