पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Pita-Putra Bhet
शिवबा जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांना अनेक सवंगडीदेखील मिळाले. ते त्यांच्याशी खेळण्यात रममाण होत असे. त्यांना मर्दानी खेळ खेळण्यास खूप आवडत असे. जिजामाता शिवबांना रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगत व ते त्या अतिशय लक्षपूर्वक ऐकत असे. शिवबा त्या गोष्टी लक्षात ठेवून खेळामध्ये राम, कृष्ण किंवा हनुमान बनून आपल्या सवंगडयांशी युद्धाचे खेळ खेळत असत आणि अशा छोटयाशा लढाईत शिवबा विजयी होत असे. थोडे जरी शिवबांच्या मनाविरूध्द घडले तर त्यांना ते आवडत नसे.
जिजामाता शिवबांना काही गोष्टी समजावून सांगत व म्हणत, “शिवबा, आपल्या राज्यात खूप शत्रू आहेत. ते आपल्या लोकांवर अन्याय करून त्यांना खूप त्रास देतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. आपला महाराष्ट्र त्यांच्या अत्याचारामुळे गेली तीनशे ते साडेतीनशे वर्ष रडतो आहे म्हणून आता तू त्या शत्रूला रडव आणि आपल्या प्रजेला हसव. माझी तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे आणि ती तू पूर्ण कर.”
शिवबा मातेचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत असे. शिवबांच्या मनावर त्या गोष्टींचा परिणाम झालेला देखील दिसत असे. शूर माणसे रडत नाही तर ती आपल्या शत्रूला रडवतात, हे शिवबांच्या लक्षात आले. शिवबा खेळताना पडले किंवा त्यांना लागले तरी देखील ते तोंडातून काही शब्द काढत नसे व त्यासाठी काही तक्रार देखील करत नसे.
शिवबा कधी-कधी खेळताना मातीचे किल्ले करण्यात खूप गढून जात असे. ते त्यावर मातीची केलेली चित्रे ठेवून लढाईचा देखावा निर्माण करीत. अशा प्रकारे शिवबा लहानाचे मोठे होत होते.
शहाजीराजांनी त्यांच्या पराक्रमाने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. त्यांना आपल्या पुत्राला भेटण्याची खूप ओढ लागली होती. जिजाऊसाहेब देखील त्यांची आतुरतेने वाट बघत होत्या. अखेर शहाजीराजे आपल्या छोटया शिवबाला भेटण्यासाठी गडावर येऊन पोहोचले. गडावर त्यांचे स्वागत झाले. शिवबा देखील आपल्या पित्यास भेटण्यास खूप अधीर झाले होते. प्रथम आल्यावर त्यांनी शिवाईदेवीचे दर्शन घेतले. नंतर जिजाऊंनी पतीच्या पायांना स्पर्श करून त्यांची चरण धूळ मस्तकास लावली. राजे सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा शिवबा त्यांच्या मांडीवर येऊन बसले आणि पिता-पुत्र यांची भेट झाली. खरोखर ते दृश्य बघण्यासारखे होते. जिजाऊंनी तो आनंदाचा क्षण आपल्या डोळयात साठवून ठेवला.
शहाजीराजांचा आपल्या कुटूंबात आनंदात वेळ चालला होता तोच त्यांना कळाले की, बादशहा शहाजहान दक्षिणेवर चाल करण्यासाठी बऱ्हाणपुरास आला होता. त्यांना ताबोडतोब शत्रूचा समाचार घेण्यासाठी जावे लागले. अतिशय जड अंतःकरणाने त्यांनी जिजाऊसाहेबांचा आणि बाल शिवबांचा निरोप घेतला.
शहाजीराजांनी स्वतः वजीर बनून निजामशाहीचा कारभार चालू ठेवला आहे हे बादशहाला समजले होते. तेथे आल्यावर त्याने प्रथम आदिलशहाला शहाजीराजांपासून दूर केले. त्यामुळे तो शहाजीराजांची संगत सोडून मोगल बादशहाला जाऊन मिळाला. शहाजीराजे आता एकटे पडले होते. शिवाय त्यात त्यांना उपयोगी पडणाऱ्या सरदार मुरार जगदेव याला आदिलशहाने कपटाने ठार केले. या संकटातून शहाजीराजांना मार्ग काढायचा होता.
पिता-पुत्र भेट | Pita-Putra Bhet हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
पिता-पुत्र भेट | Pita-Putra Bhet – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.