Raja ani Mantri Kavita

राजा आणि मंत्री | King and Minister

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

राजा आणि मंत्री…! – Raja ani Mantri Kavita by Kusumagraj

महाराष्ट्राच्या महाकवी कुसुमाग्रजांनी 1962 मध्ये “ऑथेल्लो” नाटकासाठी ही उपहासात्मक कविता लिहिली होती.

राजा आणि मंत्री…! – Raja ani Mantri Kavita

शकार झाला राजा तेव्हा ठकार झाला मंत्री

प्रकार झाले नाना त्यांची किती करावी जंत्री

मंत्री सांगे उपमंत्री से तुमान आकाशास शिवा

शिंप्याचे जे वेतन होईल हिस्सा मजला त्यात हवा

राजा वदला उजेड रविचा हजार हौदांमधे भरा

दिवे तयाचे रात्री लावा, का तेलाचा खर्च करा ?

मंत्री म्हणाला हवी कशाला रखवाली ही चहूकडे

द्या सगळे धन माझ्या जवळी इथेच करतो सैन्य खडे

राजा वदला पगार कसला काम करावे भक्तीने

उपास पडले पर्वा नाही ,पुण्य लाभते सक्तीने

मंत्री कळवी प्रजाजनांना आत्म्याचे दारिद्र हरा

राजा सांगे असार जीवित परलोकाचा मार्ग धरा

मंत्री म्हणाला मती राजाची हिमाचलाहुनी तुंग असे

राजा वदला या मंत्र्याच्या पगडीखाली शिंग असे !

कुसुमाग्रज

संदर्भ – ‘स्वगत’ – कुसुमाग्रज कविता संग्रह – मौज प्रकाशन.

Buy this Book on Amazon

Share Raja ani Mantri Kavita

You may also like

3 thoughts on “राजा आणि मंत्री | King and Minister

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock