पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
उपनावे लहाने | कीर्ती महान मिळविली
झिजवूनि निज तनूस | दलित दीना दृष्टीविली || 1
त्वचातज्ञ अति वत्सल | दयासिंधू बंधु विठ्ठल
अवतरले बंधुद्वय | शस्त्रक्रिये माजि कुशल || 2
दुर्धर हटवूनि रोग | नवजीवन दीना दिले
तिमीर भरल्या जीवनी | आनंदवना फुलविले || 3
प्रकाश मंदा उभयता | स्वहस्ते करितात सेवा
अहोरात्र करीती कष्ट | तोच लाभेत त्या विसावा || 4
पुष्पा म्हणे विभूती विना | परमेश्वर ना वेगळा
व्रता अमोल आचरिती | वंदीन सदा चरणाला || 5
पुष्पा पेंढरकर
20|06|2022