मैत्री | Friendship
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Friendship

पुनीत प्रिती संगमी
मज मैत्रिणी मिळाल्या
जीवनात मैत्रीचा
अर्थ मना उमजला ||1||

मैत्री आतूट जडली
मूल्य मोजावे कसे ?
हे मृदुल बंध रेशमी
ना कधी तुटायचे ||2||

सहजिच भेटी घडल्या
सुखद सखी संगती
मधुर तुमचे बोल मजला
दुःखातही शांतविती ||3||

नि: स्वार्थ निखळ मैत्री
लाभाविण करी प्रीती
क्षणाक्षणाला कितीक अशा
आठवणी मज येती ||4||

निवृत्त झाले मी जरी
सरलाही बहुत काळ
गीत गातो मैत्रीचे तो
मोहरतो नित्य बकुळ ||5||

वृद्धपणी एकटीच
मन होई कधी व्याकुळ
पांघरते सखी तुमच्या
मैत्रीची उबदार शाल ||6||

पुष्पा पेंढरकर

Share मैत्री | Friendship

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO