पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Stubbornness
विशाल विश्वनिर्मात्याचे जिद्दीचे वर्णन अशक्य. नद्या, सागर,वृक्ष वेली, प्राणी,चंद्र सूर्य वारा, यांचा अजब पसारा त्याने मांडला; जणू माणसाला जिद्द (Stubbornness) शिकविण्यासाठी.
जिद्द म्हणजे अट्टाहास नव्हे.योग्य विचारांनी प्रेरित होऊन धाडसाने, न डगमगता क्वचित व्यंगावर मात करून स्वतः चे आणि इतर जनांचेही कल्याण साधायचे खडतर व्रत. त्याची यथार्थ सांगता करायची बोलायला सोपे, पण करायला अवघड. यज्ञ, वेद, महाभारत रामायण, ज्ञानेश्वरी, दासबोध, शिवभारत ही जिद्दीची मूर्तीमंत रूपे! सावरकर,शास्त्रीजी, अब्दुल कलाम यांच्या जिद्दीला तुलना नाही. अपंगांची जीवाभावाची सखी ‘जिद्द’ हीच!
“पंगू:लंघयते गिरी” ही उक्ती सत्य आहे. अथांग सागरात पोहणाऱ्यांची जिद्द काय वर्णू? रामदासांनी आळसावर समास लिहिताना जिद्दीची शिकवण दिली.
मुंगी, मधमाशी, गोगलगाय, समुद्र उल्लंघून जाणारे पक्षिगण या सर्वांजवळ चिकाटी हाच प्रमुख गुण आहे.
कित्तीतरी अंध local ने सहज प्रवास करतात. काही उत्तम खेळाडू आहेत, उत्तम वादक गायक चित्रकार ही आहेत.
जिद्द चिकाटीच्या जोरावर माणूस आपल्या कीर्तीचे शिखरही गाठू शकतो.
-©पुष्पा पेंढरकर
21।04।22