पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Vasant Ritu ( Spring Season )
रामायणी निर्दाळुनी रावण
विजयी झाले श्री रघुनंदन
गुढ्या पताका उंच उभारून
जयनादे कोंदले नभांगण
अति माजला कोरोनासूर
सुखेनैव करि नरसंहार
कोणी रोखू शके न त्याला
भीती त्याची अणू रेणुला
रामरूप घेऊन वसंता
टाक जाळूनी रिपू हा आता
सौख्य देई विश्वा ऋतुराजा
उमलूदेत मनी नवीन आशा
नवं अलंकार नवं वसने लेऊन
गुढी उभारून तुज करू औक्षण
कोकीळ कवीला सूर गवसला
म्हणे ऋतू आला वसंत आला
-©पुष्पा पेंढरकर
05।04।21
Khupch sundar kavita aahe.. Ashyach chan chan kavita share kara.. Danyawad..