पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Vyasang Kavita
हव्यास नसे हा ध्यास असे हो खास ।
ग्रंथांचा मजला नित्य घडो सहवास ।।१।।
वाचाया द्या मज समीक्षा हि द मीं ची ।
वाचाया द्या मज डोह च त्या श्री विं ची ।।२।।
गूढात्मक कथने वाचीन मी जी ए ची ।
मी वाचीन कथने सुरस अशा गो मं ची ।।३।।
नच विसर पडो मज ज्ञानपीठ करांचा ।
खांडेकर, विंदा अथवा नेमाड्यांचा ।।४।।
ज्ञानेश्वर , तुकया यांना ना विसरेन ।
अन कवयित्रीं ची कवने नित्य स्मरेन ।।५।।
मज माय मराठी जगात या गर्जावी ।
हि आस मनींची परमेश्वरा पुरवावी ।।६।।
-©️सतीश पेंढरकर
Khup chan kavita. Sundar lekhan.
This blog is really a feast for all the authors, readers, and book lovers!