पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Shahaji Rajencha Vivah
नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील उमाबाई यांच्याशी मालोजींचा विवाह झाला. पुढे त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुले झाली. मालोजींनी आपल्या दोन्ही मुलांना युद्धकलेत तयार केले व व्यवहारात देखील त्यांना पक्के केले. शहाजी यांचे वय पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह जिजाबाई यांच्याशी झाला. या जिजाबाई सिंदखेडयाचे सरदार लखूजी जाधवराव यांची कन्या होय.
जाधवराव हे अतिशय नावाजलेले घराणे होते. आता जिजाबाई भोसले या लक्ष्मी बनून त्या घरात आल्या.
मालोजी आता दरबारी कामकाज पहात होते तेव्हा निजामशहाने त्यांना ‘असाल तसे लढाईवर जा’असा निरोप दिला. त्याप्रमाणे जंगदंबेला नमस्कार करून मालोजी राजे सर्वांचा निरोप घेऊन रणांगणाकडे निघाले. तेथे गेल्यावर मालोजींनी शत्रूशी शर्थीची लढाई केली परंतु अखेरीस इंदापुरच्या लढाईत ते कोसळले आणि शहाजीराजे मात्र एकटे पडले. जहागिरीचे काय असा प्रश्न होताच, परंतु चुलते विठोजी यांनी जहागिरीच्या सनदा शहाजीराजांच्या नावे करून आणल्या. शहाजीराजे निमाशाहीचे सरदार बनले.
मोगलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगर काबीज केले त्यामुळे निजामशाहीची राजधानी दौलताबाद बनले. तेव्हा शहाजीराजे जिजाबाईंसह दौलताबाद येथे राहू लागले. तेथील लोकांवर होणारे अत्याचार बघून जिजाबाईंना फार दुःख होत असे. जिजाबाईंच्या मनात विचार येत असे की, जर हे मर्द मराठे एकत्र आले तर या सर्व परकी सुलतानांचा पराभव करता येईल.
परंतु तसे न घडता वीर मराठे सुलतानशाहीत आपल्याच बांधवांना ठार करत होते. हे सर्व बदलले पाहिजे, पण हे सर्व कोण बदलणार! असा विचार करून जिजाबाईंचा जीव अतिशिय व्याकूळ होत हेाता. शहाजीराजे पराक्रमाची शर्थ करीत होते हे जिजाबाईंना दिसत होते. पण ते निजामासाठी लढत होते. परंतु एकच बाब समाधानाची होती की,लोकांवर होणारे अत्याचार कमी करता यावे म्हणून शहाजीराजे निजामशाहीचे सरदार बनले होते.
दिल्लीचा मोगल बादशहा मोठया सैन्याला घेऊन दक्षिणेत उतरला. त्यामुळे मोगल आणि आदिलशाही सैन्याशी निजामशहाच्या सैन्याची मोठी लढाई झाली. शहाजीराजांचे सासरे लखूजी जाधवराव मोगलांच्या बाजूने तर शहाजीराजे व त्यांचे बंधू शरीफजी निजामशहाच्या बाजूने एकमेकांशी लढत होते. लढता लढता त्यात शरीफजी ठार झाला. शहाजीराजे विजयी झाले परंतु सख्खे भाऊ मात्र गमावून बसले होते.
या पराक्रमामुळे निजामशहाच्या दरबारात शहाजीराजांचा मान वाढला परंतु निजामशहाचा वजीर मलिक अंबर याला ही गोष्ट मान्य नव्हती. तो शहाजीराजांचा अतिशय व्देष करत असे म्हणूनच ते आदिलशाहीत दाखल झाले. त्यामुळे आदिलशहा खूष झाला त्यांनी शहाजीराजांना ‘सरलष्कर’ हा किताब दिला. आता लढायांचे प्रमाण वाढले हाते. प्रजेवर अत्याचार होत होते, अन्याय होत होता. हा अन्याय कोण दूर करणार? हा प्रश्नच होता.
शहाजीराजेंचा विवाह | Shahaji Rajencha Vivah हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
शहाजीराजेंचा विवाह | Shahaji Rajencha Vivah – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.