पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Annapurna at home (Home Cook)
स्वतः पाककृती तयार करणे किंवा स्वतः रांधने म्हणजे स्वयंपाक…
पूर्वी एकत्रकुटंबपद्धती मधे स्वयंपाकघरात अनेक जणी मिळुन स्वयंपाक करायच्या… घरात जेवणारी तोंड बरीच आणि सुगरणी पण पदर खोचून तयार….दिवसभर स्वयंपाकघरात स्त्रीयांचा राबता असे … त्या स्वयंपाकात रमून जात…कारण तेच त्यांचं विश्व होते…
पुढं एकत्र कुटंबपद्धती लोप पावली.. एकटी वर स्वयंपाकाची जबाबदारी आली व त्या बरोबर स्त्री चे घराबाहेरील कार्यक्षेत्रही व्यापक झाले…. ती कितीही सुगरण असली तरी रोज रोज त्याच पाककृती करणे या साठी वेळ नसतो किंवा त्या पेक्षा आयुष्यात त्या वेळेचा सदुपयोग करायचा असतो… आपले कार्यक्षेत्र वाढवायचे असते… हो, नवीन काही वेगळी रेसिपी करायला तिला नक्कीच आवडते पण रोजच्या स्वयंपाकासाठी मदतीची गरज भासते….हे पण तेवढेच खरे की आज पुरुषही स्वयंपाकत खूप रस घेतात.
बऱ्या ठिकाणी दोघं मिळून स्वयंपाक करतात…..पण दोघंही बिझी असेल की !!घरात एका स्वयंपाक मदतनीसाची गरज भासते…पाहिजे त्या वेळेत स्वयंपाक तयार व्हावा…घरातील सर्वांना वेळेत जेवता यावे …..अशा बऱ्याच कारणांन साठी घराघरात स्वयंपाकीण बाई हे एक जिव्हाळ्याचे पद समविष्ठ झाले… कित्तेक ठिकाणीं पूर्ण स्वयंपाकघर त्यांच्या भरवशावर असते… प्रत्येक घरातील पद्धती प्रमाणे ती पदार्थ बनवते.. घरातील प्रत्येक व्यक्तीची आवड निवड तीला माहीती असते… घरातील प्रत्येकाला तिने कधी सुट्टी घेऊ नये असेच वाटते!
पाककला ही माणसाच्या पोटातून हृदयांत जाण्याचा मार्ग आहे…हे काम आपुलकीचे व तिथं मायेचा स्पर्श ही हवा !…
तिचे व आपलं नाते ही जिव्हाळ्याचे व आपुलकीचे हवे…तीनी केलेल्या पाककृतीचे सर्वांनी कौतुक केले तर ती खूश होते … व असा आनंदाने मायेने केलेला स्वयंपाक घरातील खाणाऱ्याच्या अंगी लागतो…. घरातील प्रत्येक जण प्रसन्न राहतो….
आज मला हे सर्व लिहावे वाटले कारण आज ललिता पंचमी, माझ्या स्वयंपाकीण बाईचे आज व्दितीय पुण्य स्मरण…. सूरेखाबाई .. ज्यांनी आमच्या कडे ३२ वर्ष स्वयंपाक केला.. घरातील व्यक्ती प्रमाणे त्यांनी आम्हाला माया लावली… मुलांना आनंदाने खाऊ घातले… नातेवाईकांनच्या आवडी निवडी लक्षात ठेवल्या… कित्येक पदार्थांची चव आजही तोंडावर आहे… आम्हाला आजही नित्य त्यांची आठवण होते…त्यांना आदर व मान म्हणून आमच्या एका कार्यक्रमात आम्हीं मुद्दाम त्यांचा सत्कार केला…
आपणही आपल्या स्वयंपाकीण बाईन विषयी आठवण सांगू शकता, अनुभव सांगू शकता!!
हे पण खरे की काही जणींना स्वतः रोज जेवण बनवायला आवडते.. त्यांचें नक्कीच कौतक!
घरा घरातील अन्नपूर्णा (स्वयंपाकीन बाई) | Annapurna at home (Home Cook) हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
घरा घरातील अन्नपूर्णा (स्वयंपाकीन बाई) | Annapurna at home (Home Cook) – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
3 thoughts on “घरा घरातील अन्नपूर्णा (स्वयंपाकीन बाई) | Annapurna at home (Home Cook)”