पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Activists Let Us Pick Up Carpets and Shoes
उठा उठा निवडणूक आली,
जोडे उचलण्याची वेळ झाली…
लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
कोणी पार्थ घ्या,
कोणी रणजित घ्या..
कोणी आदित्य घ्या,
अरे कोणी विख्यांचा सुजय घ्या…
घराणेशाही बळकट करूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
दत्तांची प्रिया अन महाजनांची पूनम,
सुळ्यांची सुप्रिया अन मुंड्यांची प्रीतम…
महिलाशक्तीचा जागर करूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
ठाकरे, पवार, मुंडे, गांधी,
हीच तर देशाची खरी संपत्ती…
घराणेशाहीचा वारसा बळकट करूयात…
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
चपटीतला पेग, अन मटणाचं हाडुक,
आपापल्या साहेबांच्या कथा, अन भक्तीच्या गाथा…
चवीने पोटभर चघळूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
प्रपंचाची होळी, साहेबांची राजकीय पोळी,
बकाल आयुष्याचा तांडा, पण झेंड्याचा दांडा…
झुंडीने उंच उंच मिरवूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
करतल, पादुका अन चरणस्पर्श,
हेच आपुले कर्म, अन हाच आपुला चरितार्थ…
जयजयकार अन गर्जनांनी साहेबांना वंदुयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
देशभक्त तोच.. जो सीमेवर मरे,
तुम्हा रोजच्या कार्यकर्त्यांच्या कुत्र्यागत मरण्यावर कोण रडे…❓
साहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालूयात,
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
नेता झाला, नेत्याचा मुलगा -पुतण्या आमदार, खासदार झाला, आता नातू आला,
कार्यकर्ता मात्र पुन्हा सतरंजी उचलण्यास तयार झाला..
अरे येडयांनो…
आपली परंपरा कायम राखुयात,
लाज-शरम खुंटीला टांगून ठेवूयात,
चला कार्यकर्ते हो ….आपण कायमच सतरंज्या, जोडे उचलूयात….❗
हे ज्यांनी कोणी बनवल आहे खूपच सुंदर बनवल आहे..
सत्य परिस्थिती सांगितली आहे. मला आवडल्याने मी जशास तसे पुढे फॉरवर्ड करत आहे.. जेणेकरून हे वाचल्यानंतर किमान एक तरी कार्यकर्ता घराणेशाहीच्या जीवावरील भैया – दादा- भाऊंचे जोडे उचलायचे बंद करेल.
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात…. | Activists Let Us Pick Up Carpets and Shoes हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
चला कार्यकर्ते आपण सतरंज्या, जोडे उचलूयात…. | Activists Let Us Pick Up Carpets and Shoes – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.