पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Bhavachya Sagari
विषय – मनाचे किनारे (Edges of the mind)
शीर्षक – भवाच्या सागरी
भवाच्या सागरी
जीव नौका डुबे ।
तिला सावराया
मनाचे किनारे ।1।
घेऊनी आपदा
येई चक्री वात ।
भीती दाटे कधी
अडविते वाट ।2।
वादळ कि शीळ
उमजेना काही ।
रौद्र रूपा विना
साथी कुणी नाही ।3।
न साहवे व्यथा
दुःख अंतरीचे ।
शांतविती तेंव्हा
किनारे मनाचे ।4।
स्वप्नात मोगरा
सुखवीत आला ।
सत्य मी शोधिता
हरवून गेला ।5।
दावी प्रभुलीला
एक जगदिश ।
लागला मनाला
रात्रंदिन ध्यास ।6।
12।04।22