पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Moisture
उष्ण वात चैत्र मासी
शीत झुळूक वाऱ्याची ।
शब्द जुळविती मनी
ओल आगळ्या स्मृतींची ।।1
सुख दुःखा मिसळुनी
वस्त्र विणले मानवा ।
भाळी लिहुनी प्राक्तना
दिला जन्म एक नवा ।।2
देवळात आळवीत
आर्त कुणी आसावरी ।
व्याकुळ मना आठवी
जखम ओली अंतरी ।।3।।
संकटात दिली साथ
माहेरची येई याद ।
मोहवीत रात राणी
सुगंधित घाली साद ।।4।।
कर मृदुल सायीचे
घातले गळा कुणी ।
बाळकृष्ण ते प्रपौत्र
सुखविती क्षणोक्षणी ।।5।।
जीर्णवस्त्र विरले ते ।
जरी ते अमोल नेणे
पराधीन नको जिणे
एक इशा ते मागणे ।।6।।
-©पुष्पा पेंढरकर
09।04।2022