पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Parody poem
चाल: सांग सांग भोलानाथ
बोल कान्हा कृष्णा बोल
लोणी चोरलेस काय
काठी घेऊन शिंक्यावरचे
मडके फोडलेस काय —कृष्णा बोल
दूध तूप दही आता
नाही शिंक्यावरी
नाही मंथन नाही गोपी
ताकही मिक्सर करी ।।
नको जाऊ नंदलाला
राधेच्या घरी
पॅक बंद दूध तुला
सोसेल का रे हरी ।।
कोठे धेनु गोप गोपिका
मधु बासरी सूर
पौर्णिमेच्या रात्रीलाही
सुनेच यमुना तीर।।
कृष्णा तुला नाही सध्या
काही काम धंदा
सडक सख्या हरी अशीच
होत तुझी निंदा ।।
चेष्टा नाही केली माधव
नकोच हा रुसवा
तुम्हीच वाचून विडंबना या
रसिकांना हसवा ।।
–©पुष्पा पेंढरकर
१८.०१.२२
One thought on “विडंबन काव्य | Parody Poem”