पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Chimb Bhijtana
ग्रीष्म निखारा जाळीत मजला
मुळी न त्याच्या मनी कळवळा
मम दुःखा ना जाणिले कुणी
धरती गाते आर्त विराणी
सरीवर सरी ओतू देत अमृत
होईल तनु -मन माझे शांत
दिले वस्त्र ग्रीष्माने जीर्ण
क्षणात देईन सखे झुगारून
येशील घेऊन शालू हिरवा
सखि, माळुया वेणीत मरवा
श्याम सावळ्या बघुनि घनाला
फुलेल अवचित मोर पिसारा
चिंब चिंब सरीत भिजताना
अधरी येतील सुरेल ताना
केतकी चाफा बहरुनि यावा
सुगंधात आसमंत भिजवा
One thought on “चिंब भिजतांना | Chimb Bhijtana”