पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
आज एबीपी वरील “माझा कट्टा “या कार्यक्रमात गौर गोपाल दासजी यांनी सांगितलेली गोष्ट इथे रिलेट होतेय असे वाटते.
एका देवळावर दोन कबुतरे बसली होती. परंतु दिवाळीच्या सणाच्या निमित्त देऊळ रंगरंगोटी करायची होती. म्हणून ती दोन्ही कबुतरे उडाली व शेजारी असलेल्या मशिदीवर बसली. थोड्या दिवसांनी ईदच्या सणाला म्हणून मशिदसुद्धा सजवण्याचे काम सुरु झालं. त्यामुळे पुन्हा कबूतर उडाली व शेजारीच असलेल्या चर्चेवर जाऊन बसली.
आता गंमत अशी देवळावरून उडालेली कबुतरे जेव्हा मशिदीवर बसली तेव्हा मशिदीवर अगोदरच कबुतरे होती व ती त्यांना म्हणाली की आम्ही येथे राहतच आहोत तुम्ही त्यातच सामील व्हा. हे सगळे नंतर चर्च वर गेल्यावर चर्च वर असलेल्या कबूतरांमध्ये ही पण सामील झाली आणि सगळे गुण्यागोविंदाने नांदू लागली.
काही दिवसांनी त्य एका कबुतराचे एक पिल्लू आईला म्हणाले, ‘खाली रस्त्यावर सारखे भांडणे होत आहेत ते काय आहे?’ आई म्हणाली,’ ती माणसे आहेत व ती भांडत आहेत. देवळात जातो तो हिंदू, मशिदीत जातो तो मुस्लिम, चर्चमध्ये जातो तो ख्रिश्चन. म्हणून आपापले धर्म घेऊन ती भांडत आहेत’. पिल्लू म्हणाले,’ आई आपण देवळावर होतो तेव्हा कबुतरे होतो व नंतर मशिदीवर गेलो तरी आपण कबूतर राहिलो आणि आता आपण चर्च वर आहोत आणि तरीही आपण कबूतरेच आहोत’. तेव्हा आई म्हणाली,’ ती फार खालच्या लेव्हल वर आहे म्हणून भांडत आहेत. आपण वरती कळसावर खुप वरच्या पातळीवर आहोत आणि म्हणून आपण सारी कबूतरेच आहोत.’ कारण
“When we rise spiritually, boundaries will melt”.
-©भारती पंडित काळे
अध्यात्म सीमा वितळवते – Spirituality melts boundary ही कथा आवडली असल्यास शेअर करा.
अध्यात्म सीमा वितळवते – Spirituality melts boundary – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.