पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
दिवाळी चा फराळ डबे हुडकून खाण्यात जी मजा आहे ना ती काही न्यारी च आहे. प्रत्येकानं लहानपणी अनुभवलेल्या प्रसंगावर कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अतिशय लोभस, खेळकर कविता केलीय् ती आठवण चेहऱ्यावर मिश्कील हसू आणते.
अडम तडम, स्टुलावर चढम,
संभाळून चढम नाहीतर पडम
धडम धडम !
अब्बा अब्बा, फळीवर डब्बा ,
नक्की नक्की, गोष्ट पक्की
आडू पाडू, डब्यात लाडू
डब्यावर हल्ला, डल्ला डल्ला !
खिशात लाडू भरुन घेवम,
जिथल्या तिथे डब्बा ठेवम,
डबा झाकम, पाय हळूच खाली टाकम !
अडम तडम , संभाळून उतरम
गुपचूप गुपचूप बाहेर पडम
अडम तडम, अडम तडम !
6 thoughts on “दिवाळीच्या फराळाची गम्मत – अडम तडम | Diwalichya Faralachi Gammat (Adaam Tadaam Kavita)”