Equinox
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Autumn Equinox 2022

कालचक्र ऐसे । फिरतच राही ।

एकामागे येई । दिन रात ।।१।।

समानता नसे । कालावधीमध्ये ।

दिन रातीमध्ये । बहुतांशी ।।२।।

दिवस नि रात्र । होती छोटे मोठे ।

बदलत जाते । ऋतुमान ।।३।।

परि एक दिन । ऐसाही तो येई ।

समान ती होई । दिन रात्र ।।४।।

होती दोन भाग । चोवीस तासांचे ।

द्वादश तासांचे । तंतोतंत ।।५।।

एक वर्षांमध्ये । येती दोन दिन ।

ते विषुव दिन । नामे होती ।।६।।

सप्टेंबर मासी । तारीख तेवीस ।

राही रात्र दिस । बारा तास ।।७।।

सूर्योदय होई । ज्यावेळी सकाळी ।

अस्त त्याच वेळी । सायंकाळी ।।८।।

शरद संपात । विषुव दिवस ।

असे इक्विनॉक्स । हाच दिन ।।९।।

खगोल शास्त्राचे । ऐसे अनुमान ।

घ्यावे ते जाणून । सकलांनी ।।१०।।

शरद संपात । विषुव दिवस ।

असे इक्विनॉक्स । हाच दिन ।।९।।

खगोल शास्त्राचे । ऐसे अनुमान ।

घ्यावे ते जाणून । सकलांनी ।।१०।।

विषुव दिनानिमित्त …

©️ प्रविण शांताराम,पनवेल, रायगड

Share विषुव दिन | Equinox

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock