History of Shri Dnyaneshwari Jayanti

श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा रोचक इतिहास | Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti

भाद्रपद वद्य षष्ठी ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल परंतु ते खरे नाही. पैठणनिवासी शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी इ.स.१५८४ साली याच तिथीस या ग्रंथाची शुद्धप्रत तयार करुन पूर्ण केली.

Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti

झाले असे कि, समाधीस्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजानवृक्षाची मूळी काढण्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरमहाराजांनी संत एकनाथमहाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलावून घेतले. नाथमहाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि, माऊलींची समाधी सापडत नाहिये. परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहित नसल्याचे कळले. यदाकदाचित समाधी असली तरी ते स्थान नेमके कोणते हे सांगता येत नाही असे कळाले.

आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळीना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगुन नाथमहाराज तेथिल जंगल सदृश्य परिसरात गेले.माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. त्यातच परिसरात असलेल्या अनेकानेक समाध्या ! मग यातील नेमकी माऊलींची समाधी कोणती? हा प्रश्न पडला. मग एका स्थानावर बसुन नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. (हे स्थान म्हणजे हल्ली माउलींच्या समाधी मंदिरात असलेला ‘शांतिब्रह्म श्री संत एकनाथमहाराज पार’ होय.) ज्ञानेश्वरमहाराजांनी समाधीच्या आत येण्याचा निर्देश केला त्याप्रमाणे नाथमहाराज नंदी खालील द्वारातुन आत गेले. तेथे श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथ हरखून गेले.

श्रीज्ञानदेवे येउनी स्वप्नात ! सांगितली मात मजलागी !! दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा ! परब्रह्म केवळ बोलतसे !!

अशी त्यांची भावना झाली. चर्चा सुरु असताना श्रीज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या, हेतुपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झालेे असल्याचे नाथमहाराजांनी जाणले. त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकारसंपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रुपाने पूर्ण होणार होती. त्यामुळे अजानवृक्षाच्या मूळीचे निमित्त करुन माऊलींनी नाथमहाराजांना बोलावून घेतले होते. या दोन महात्म्यांचा श्रीज्ञानेश्वरी संदर्भाने समाधीत तब्बल तीन दिवस संवाद चालला.

तीन दिवस झाले तरी नाथ महाराज वापस न आल्याने बरोबर आलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली. भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वाण्याचे रुप घेतले व नाथ महाराजांनी तुमची शिधापाण्याची व्यवस्था लावण्याचे सांगितले असल्याचे त्यांना सांगितले.

समाधीस्थानातुन बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथ सर्वांना त्या स्थानी घेउन आले व सर्वांना माऊलींचे दर्शन घडविले. समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला,मूळ गाभारा बांधला, मंदिर परिसर सुशोभित केला, नित्य पुजेची व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिकीयात्रा पुन्हा सुरु केली.

या नंतर वर्षभरातच श्रीसंत एकनाथमहाराजांनी श्रीक्षेत्र पैठण येथे श्रीज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी ! आणि तोच दिवस श्रीज्ञानेश्वरी जयंती म्हणुन वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी इ स १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहुन पूर्ण केली परंतु समाप्तीची तिथी न लिहिल्याने नेमका श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा दिवस कोणता ? हे सांगता येत नाही.

पुढील काही काळात नाथमहाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरीलही श्रीज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रति जमा करुन शुद्ध प्रति तयार केल्या व शुद्धप्रती वापस पोचत्या केल्या.

आज ज्या श्रीज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो ती श्रीनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे.म्हणुन नाथ महाराज हे श्रीज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत. एवढेच काय तर ते मराठी वाङ्मयाचेही आद्य संपादक ठरतात.श्रीएकनाथमहाराजांनी ग्रंथाच्या शेवटी चार ओव्या लिहुन ठेवल्या आहेत त्या अशा –

शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी ! एकाजनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!!

ग्रंथ पुर्वीच अतिशुद्ध ! परि पाठांतरी शुद्ध अबद्ध ! तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!!

नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका ! ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!!

बहुकाळ पर्वणी गोमटी ! भाद्रपद मास कपिलाषष्ठी ! प्रतिष्ठानी गोदातटी ! लेखन कामासाठी संपूर्ण जाहली !!४!!

हा आहे श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा इतिहास ( Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti ) !

ही अनमोल व जुनीच परंतु तरीही नवी माहिती इतरंपर्यंतही पोचवा.

Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti

संकलन- श्री सद्गुरू ह.भ.प श्री योगीराज महाराज गोसावी ( पैठणकर ) शांतिब्रह्म श्रीमंत श्रीसंत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज…

जय ज्ञानेश्वर…. जय एकनाथ….

||श्री स्वामी समर्थ महाराज की जय||

श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा रोचक इतिहास | Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा रोचक इतिहास | Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा रोचक इतिहास | Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti

You may also like

3 thoughts on “श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा रोचक इतिहास | Interesting History of Shri Dnyaneshwari Jayanti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO