The morgue - the ghost of the nurse

मुर्दाघर – नर्सचं भूत | The Morgue – The Ghost of the Nurse

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

The Morgue – The Ghost of the Nurse

मुंबई स्वप्नांचं शहर इथे मध्यमवर्गीय, गरिबां पासून श्रीमंत लोकांपर्यंत सर्वच लोक येतात आपलं आणि आपल्या परिवाराचे पोट भरायला इथे काम करतात !

पण अशीच एक घटना मुंबईतील सर्वात जुन्या हॉस्पिटल मध्ये घडली होती !

सन 1970 चा काळ होता ! लक्ष्मण देसाई नावाचा एक तरुण या हॉस्पिटल मध्ये मुर्दाघराच्या गेटवर सिक्युरिटी गार्डच्या कामाला लागला होता !

लक्ष्मण हा एक मध्यमवर्गीय तरुण मुंबईतील वरळी येथील एका चाळीत तो आणि त्याचं कुटुंब राहायचं !

घरची परिस्थिती हलाकीची, बाप व्यसनाधीन दारूच्या नशेत बुडालेला असायचा, काबाडकष्ट करून लक्ष्मणच्या आईने त्याला जेमतेम शालेय शिक्षण दिल त्यानंतर त्यानें 10 वी नंतर शिक्षण सोडलं आणि भेटेल ते काम करून तो घराला हातभार लावत होता !

हॉस्पिटल मध्ये त्याला नोकरीं लागल्याने घरात सर्व आनंदात होते ! आईच्या कष्टासोबत पोराच्या कष्टाचे 2 पैसे जास्त आल्याने घरात तेवढा हातभार लागतं होता !

हॉस्पिटल सकाळी कितीही वर्दळीचे ठिकाण असले तरी रात्री हॉस्पिटल आणि मुर्दाघरा (The Morgue) भोवती भयाण शांतता पसरलेली असते !

मुर्दाघराच्या इथे कधी नाईट तर कधी दिवसाच्या वेळेला त्याला राहावं लागतं असे !

नवीन असल्याने इतर कर्मचाऱ्यांकडून त्याला इथे घडलेल्या भुताटकीच्या गोष्टी ऐकायला मिळत असत पण लक्ष्मणाचा भुताटकीवर विश्वास नव्हता !

8/9 वर्षांपूर्वी इथे एक नर्स काम करायची जी रात्रपाळीला होती तेव्हा तिला वॉर्ड बॉय ने गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला गेला होता आणि तिचं डोकं दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली होती ! तिचं शरीर काही काळ त्याच मुर्दा घरात ठेवलं गेलं होत !

त्या दिवसाच्या काही महिन्यापासून त्या हॉस्पिटलच्या त्या भागात जिथे खून झाला आणि जिथे तिचं शरीर ठेवलं होत तिथे विचित्र घटना घडू लागली होती आणि याला घाबरून अनेक सिक्युरिटीगार्ड नोकरीं सोडून गेले होते !

त्याच जागेवर लक्ष्मण राहिला होता !

कामाला लागल्या पासून काही 29/30 दिवस झाले होते त्याला काही जाणवलं नव्हतं !

पण त्याला ही नाईट ड्युटी त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव असलेली ठरणार होती याची त्याला अजिबात कल्पना नव्हती !

एक रात्र असच लक्ष्मण रात्रपाळीची ड्युटी करायला हजर झाला होता ! आणि ती रात्र अमावास्येची रात्र होती !

मुर्दाघर हॉस्पिटलच्या इमारती पासून थोडं स्वतंत्र होतं ! त्यामुळे तिथे लक्ष्मण आणि एक भटका कुत्रा सोडला तर कोणीही नव्हतं !

टाईमपास म्हणून लक्ष्मण पेपर आणायचा आणि ते वाचत बसायचा !

सोबत त्या हॉस्पिटल मध्ये काम करणारा वॉर्ड बॉय अमित हा लक्ष्मणचा चांगलाच मित्र बनला होता ! तो अधून मधून गप्पा मारायला तिथे भटकायचा ! पण गप्पा मारणे हा हेतू नसून लक्ष्मण घाबरणार नाही ना या काळजीमुळे अधून मधून तो त्याला भेट द्यायला यायचा !

असचं पेपर वाचत असताना कुत्रा मुर्दाघराकडे पाहून भुंकू लागला ! त्या दिवशी अमित काम जास्त असल्याने लक्ष्मणला भेटायला तिथे आला नव्हता !

सुरवातीला लक्ष्मण याने कुत्र्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला “गप बस रे काळ्या कोणी नाही तिथे ! ” म्हणत शांत करायचा प्रयत्न केला पण कुत्रा हा शांत व्हायचा नाव घेत नव्हता !

तेव्हा त्यानें एकदा आत जाऊन पाहावं या साठी तो दरवाजा उघडून मुर्दाघरात गेला !

आत जाताच दरवाजा बंद झाला !

दरवाजा बंद होताच थोडी भीती त्याला वाटलीच होती ! त्यानें दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण दरवाजा खुलत नव्हता !

पण भीती दूर करायला स्वतःलाच दिलासा द्यायला तो म्हणाला ! ” अमित, प्लिज मस्करी करू नको दरवाजा उघड ! ” पण बाहेरून कसलंच आवाज येत नव्हतं !

इतक्यात मुर्दाघरात अनेक व्यक्तीचं हसण्याचा आणि रडण्याचा आवाज घुमू लागला !

काय होतंय हे लक्ष्मणाला समजतच नव्हतं !

इतक्यात त्याच्या समोर एक नर्स आली जिचा चेहरा पट्टीने पूर्णतः बांधला होता ! आणि जिच्या शरीराचा रंग काळा पांढरा पडला होता ! ती विचित्र आवाजात ” बदला… बदला… तुला नाही सोडणार !’ म्हणत ती हळू हळू लक्ष्मणच्या जवळ येत होती!

लक्ष्मणाच्या पायाखालची जमीन सरकली तो घामाने चिंब झाला ! त्याची बोबडी वळाली होती तोंडातून आवाज फुटत नव्हते ! इतक्यात सर्व ताकद एकवटून त्यानें जोरात किंचाळून ” अम्या, वाचव कोणीतरी वाचवा !’ म्हणत आरडा ओरडत सूरु केली, !

पण त्या जागेत कोणाची वर्दळ नसल्याने आणि सुमसान जागा असल्याने तिथे कोणी येऊ शकत नव्हते !

घाबरून लक्ष्मण दोन पायात डोकं घालून दरवाजाच्या लेफ्ट साईडला बसला ! भीतीने त्यानें चड्डीत लघवी केलेली होती व तो तिथे बेशुद्ध पडला ! इतक्यात अमितने आवाज देऊन दरवाजा उघडला !

शुद्धीवर येताच त्याला आपल्या भोवती गर्दी दिसली अमितने तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणले होते !

सर्व प्रकाराने लक्ष्मण इतका भयभीत झाला होता त्याच्या तोंडून फक्त ” ती… तिथे… ती नर्स ” इतकंच बाहेर पडत होतं !

त्याला अमितने धीर दिला आणि मग लक्ष्मणाने सर्व प्रसंग त्याला सांगितले !

अमित तिथे कसा आला विचारताच ! लक्ष्मण सोबत असणारा भटका कुत्रा काळ्या अमितकडे भुंकत पळत आला आणि त्याच्या दोन पायात शिरून तो कुई कुई आवाज करत पुढे 4 पावले चालून त्याला खुनवत होता !

अमितने ओळखलं की काहीतरी झालं असेल म्हणून अमित कुत्र्या सोबत पळत तिथे आला आणि त्यानें दरवाजा बाहेरून उघडला !

त्या नर्सने आजवर कोणालाही जीविताची हानी केलेली नव्हती पण एक भटक्या कुत्र्याने प्रसंगावधान राखत खाल्या तुकड्याची जाणीव ठेवत लक्ष्मणच्या मदतीला अमित याला घेऊन आला होता !

सर्व प्रकाराने लक्ष्मण खूप भयभीत झाला होता त्यानंतर त्यानें ते काम सोडलं !

आजही तिथे त्या नर्सचं आस्तित्व लोकांना जाणवतं !

तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्कीच कळवा !

आमच्या एका वाचकाने ही गोष्ट मला सांगितली होती त्याच्या नातेवाईका सोबत हे घडलं होतं त्यात काहीसं बदल करत त्या व्यक्तीचं नाव आणि हॉस्पिटलचं नाव गुप्त ठेवत मी ही कथा लिपिबद्ध केली आहे.

मुर्दाघर – नर्सचं भूत | The Morgue – The Ghost of the Nurse हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

मुर्दाघर – नर्सचं भूत | The Morgue – The Ghost of the Nurse– आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share मुर्दाघर – नर्सचं भूत | The Morgue – The Ghost of the Nurse

You may also like

2 thoughts on “मुर्दाघर – नर्सचं भूत | The Morgue – The Ghost of the Nurse

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock