Gharbhar Prakash

घरभर प्रकाश | Gharbhar Prakash | Light all over the house

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Gharbhar Prakash | Light all over the house

सहजपूर नावाचे गाव होते. त्या गावात केशव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे शेतकरी कुटुंब राहत होते. त्यांना दोन मुले होती. आरव आणि सायली. ते सगळेजण खूप आनंदात राहायचे. आरव आणि सायली दोघेही रोज शाळेत जात असत.
शाळेतून आल्यावर ते दोघे आई-बाबांना कामात मदत करायचे.
एके दिवशी बाबांनी दोघांत मिळून १० रुपये दिले. मुलांना आनंद झाला.

मुलांना प्रश्न पडला. त्यांना काही सुचेना. ते एका दुकानात गेले. तेथे त्यांना अनेक वस्तू दिसल्या. दोघांनी
मिळून खूप विचार केला. त्यांना एक युक्ती सुचली.

दुकानातून दोघांनी एक पणती विकत घेतली. संध्याकाळ झाली. त्यांनी पणतीत तेल ओतले. कापसाची वात केली. पणती
लावून ठेवली.
तेवढ्यात आई-बाबा आले. त्यांनी पाहिले. सारे घर प्रकाशाने उजळून निघाले होते.

दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले, याचा आई-बाबांना खूप आनंद झाला. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतले व शाबासकी दिली.

क्रेडिट बालभारती

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock