पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Kojagiri Purnima | Sharad Purnima
(दिंडोरी प्रणीत उत्सव)
१९ऑक्टोंबर मंगळवार
कोजागिरी पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात.
त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.हा उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी असतात त्यांना अमृताचा (दुध) नवैद्य लागतो.
कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima | Sharad Purnima) पूजाविधी मांडणी
मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
- लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचे जोड पण सुपारी ठेवावा.
- विड्याचे जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
- तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा. अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२:३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
- चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा.
- १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुफारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी
ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यू भय I शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा II - दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपारी जपून ठेवून दरवर्षी पुजाव्यात. कोजागारीस त्यांची पूजा करावी. १२ ते १२:३० या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी
- त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ११ माळा जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र, प्रत्येक १ माळ जप करावा, तसेच १६ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा व गीतेचा १५ वा अध्याय वाचावा.
हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा! लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लाक्स्मिलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी हि परमदयाळू आहे. कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.
या मोठ्या बहिणीस ‘अक्काबाई’ म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की ‘अक्काबाईचा फेरा आला’ हि अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे कोण जागे आहे. ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय ? को जागर्ती ? यावरून या पौर्णिमेला ‘कोजागरी’ (Kojagiri Purnima | Sharad Purnima) हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो ‘कोजागार्ती’ असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले.
(अधिक माहिती:- नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपलब्ध किंवा श्री स्वामी सेवा मासिक ऑक्टोंबर )
2 thoughts on “कोजागिरी पौर्णिमा | Kojagiri Purnima | Sharad Purnima”