पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Lift
कार मधे तिला लिफ्ट देऊन मध्यरात्री त्याने तिला जंगलात मदत केली म्हणून तिच्या हातावर हात ठेवत त्याने विचारले,”अर्ध्यारात्री कुणा पुरुषाबरोबर एकटे गाडीत बसायला भीती नाही वाटत?”
त्याचा इशारा तिला समजला होता. वासना त्याच्या डोळ्यात दिसत होत्या…
तिने हळूच त्याच्या हात घट्ट पकडुन म्हटले,” नाहीरे, इथे येणारे लोक सज्जन असतात,गेल्या दोनशे वर्षापासून तरी कोणीच मला काहीच केले नाही”आणि तिने हात अजून घट्ट केला..त्याला तिच्या डोळ्यातला खट्याळपणा आणि दोनशे वर्षाचा अनुभव घट्ट होणाऱ्या हातात जाणवत होता.त्याने हळूच तिला जरा बाथरूमला जाऊन येतो म्हणून खाली उतरला आणि तिथून पळत सुटला.
दहा मिनिटांनी ती कारच्या बाहेर आली आणि तिने एक शिट्टी मारली…चार मुली अजून झाडी झुडप्यातून बाहेर आल्या….आता पांची जणी कार मधे बसल्या आणि कार शहराकडे धावू लागली…ती म्हणाली,”भित्रे असतात ग हे पुरुष,फक्त आपल्याला त्या भीतीची जाणीव करून द्यावी लागते….शक्ती जरी त्यांच्या कडे असली तरी आपल्याकडे निसर्गाने मेंदू दिलाय आपले संरक्षण करायला.”…..थोड्या पुढे गेल्यावर तो पळताना दिसला…त्याच्या जवळ गाडी नेऊन तिने विचारले,”बसतोस का गाडीत?”
त्याने त्या दिशेने पाहता आता त्याला एकाच्या जागी पांच …. हडळ एकत्र दिसता त्याला घाम फुटला आणि तो जागीच बेशुद्ध होऊन पडला.
-©सौ. अनला बापट
लिफ्ट | Lift हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
लिफ्ट | Lift – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.