पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
वर्णू कशी माझी माय ।
दुधावरी दाट साय ।।
वात्सल्याचे मूर्त रूप ।
ती नित्य मनात समीप ।।
आई सुखाचा सागर ।
दिले प्रेम अपरंपार ।।
आई मांगल्याचे गीत ।
समईतील शांत ज्योत ।।
माय आनंदाचा घन ।
थोरच ती स्वर्गाहून ।।
नाही देव देवालयी ।
आई रूपे घरात राही ।।
गतजन्मीचे सुकृत ।
आई हेच मम दैवत ।।
सांगे ब्रह्मा परोपरी ।
हिंडतो आईवीण भिकारी ।।
-©पुष्पा पेंढरकर
18|3|21
2 thoughts on “माझी माय | Mazi Maay”