Ornaments of "Halwa"

अलंकार हलव्याचे | Ornaments of Halwa

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Ornaments of “Halwa”

निळ्या नभात उगवली
सुरेख शुभ्र चांदणी
तेजस्विनी कुणी रमणी
अवनिवरी स्मितवदनी

चंद्रकळा खुलवित अति
कर्पूर गौरकांती
चाफेकळी नाकामध्ये
नथ टपोर मोती

कुंडले कानात डुले
झुळूक कानी बोलते
नाजूकशी चंद्रकोर
विशाल भाळी मिरविते

कंठात साज कोल्हापुरी
थाट काय वानु मी
मंगळसूत्र करि घेऊनि
लाजत सखी अंतरी

ठसठशीत चंद्रहार
पदक त्यात शोभते
हरित कंकण गोठ पाटल्या
गौर करा सजविते

कुरळ कुंतली मोगऱ्याचे
शुभ्र हार सुखविती
भाव अमल नयनातील
सांग कुणा शोधिती

अलंकार हलव्याचे
सासूबाई गुंफिती
सुता स्नुषा प्रियंवदाही
सखी एकच लाडकी
-पुष्पा पेंढरकर

Share Ornaments of “Halwa”

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.