Memories of You

स्मरण तुझेच | Memories of You

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Memories of You

माता पिता सखा तू
तुजविण नाही नाते ।
चालविसी बोलविसी
स्मरणी तुला साठवते ।।

झाल्या चुका अनेक
त्यातुन तू सवारीले ।
पावन अति नाम तुझे
सतत मुखी राहिले ।।

तू सगुण कि निर्गुण
ना कळते मज काही ।
महती गाती संत किती
शरण मीही तव पायी ।।

ध्यानमग्न कुंभार
मुखी विठ्ठल विठ्ठल ।
नुरलेच भान काही
मातीत तुडवी बाळ ।।

हात राबती मळ्यात
स्मरणी विठू सावळा
शब्दात सांगू कैसे
सावत्याचा भाव भोळा ।।

क्षणोक्षणी नाम मुखी
स्मरणी तुझे चिंतन ।
नाही सुखास तुलना
पाकळी तुज अर्पून।।

-©पुष्पा पेंढरकर
31।03।22

Share

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.