पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Saint
ईश अवतार – संत या भूवर |
दीन दलितांचा – कराया उद्धार ||1||
जाती वर्ण भेद – सारे विसरले |
अत्यंज बाळक – अंकी खेळविले ||2||
तुषार्त गर्दभा – पाजोनि जीवन |
नाथे साधियेले – धन्य ते जीवन ||3||
शांती समाधान – संताचे भूषण |
अमर संतवाणी – आनंद निधान ||4||
कृपावंत संत – दयेचे सागर |
भोळ्या या भक्तांचा – प्रभू हो चाकर ||5||
भक्तीचिया बळे – विठू लेकुरवाळा |
ऐशा या संतांचा – लागो मना लळा ||6||
-©पुष्पा पेंढरकर
6 thoughts on “संत | Saint”