पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Rain
थेंब थेंबा प्राशितांना, तृप्त झाला चातक
मौज वाटे मोर नाचे, पाहुनी हे कौतुक
सख्या पावसा बघून दारी, अधिर धरा हि लाजे ।
साज अर्धा राहिलेला, केस मोकळे स्वैर तिचे
क्षणात नटवित, मौक्तिक सरी तिज, नववधूच भासली
सजल श्याम घननीळा भेटण्या नव्हे धरा – ही राधा आली
हसते राधा प्रसन्नतेने, काही सांगतो हरि कानी
अवघे सुरगण, बघति वाकुन, इंद्रधनुच्या कमानीतुनी
-©पुष्पा पेंढरकर
One thought on “पावसाळा | Rain”