पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Shawl
प्राणाहुनही मनात जपला
नाजूक बकुळ शेला
थकल्या हाती अवचित अलगद
ओंजळीत उचलला
त्या फुलाफुलातून कितीक बालिका
माजभवती जमल्या
एकिमागून एक तारका
भूवरी अवतरल्या
त्या प्रौढ , तयांचे मज आठवले
अनुपम ते शैशव
वुद्धपणी नव नवल सोहळा
नवाच हा अनुभव
भाव आमल , कोवळ्या मुखावर
नयन अति बोलके
मधाळ शब्दे , हितगुज मजशी
ऐकत मी कौतुके
लटके लटके रुसवे फुगवे
किती लटका भांडणे
क्षणात विसरून , गळ्यात पडणे
हसणे अन खिदळणे
बाल संख्यांच्या नित्य संगती
नुरली वेदना व्यथा
छाया तुमची सुखवीत होती
काट्यातून चालता
दृढ यत्नांचे पंख लेवुनी
कीर्ती यश तुम्ही जिंकीयली
तुम्हास देण्या शेल्यावाचून
जवळी काही नच उरले