पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
The World | Married life
संसार हा असार नसून जीवनाचे सार आहे. संसार वजा केला तर मानवी जीवनाला काही अर्थच उरत नाही. संसार अनिष्ट नसून संसाराकडे पाहण्याची माणसाची दृष्टी अनिष्ट असते. ‘नाचता येईना म्हणून अंगण वाकडे‘ या म्हणी प्रमाणे संसार यशस्वी करण्याची कला जे शिकत नाहीत त्यांनाच संसार त्याज्य वाटतो. ज्यांना पोहण्याची कला अवगत असते ते पाण्यात डुंबतात, खेळतात व मौज करतात. याच्या उलट पोहण्याची कला ज्यांना अवगत नसते ते पाण्यात गटांगळ्या खातात, गुदमरतात व बुडतात. संसार सागराचे तसेच आहे. संसार सुखी करण्याची कला जे शिकतात ते संसारात रमतात व रंगतात, याच्या उलट संसार सुखी करण्याची कला ज्यांना ज्ञात नाही ते संसारात तळमळतात व तडफडतात.
संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ.
संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा, जीवनविद्या गुह्य सांगते या विद्येचा घोष करा.
प्रपंच फाटका तर परमार्थ नेटका होणे कठीण.
– सद्गुरू श्री. वामनराव पै
आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.