पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Wife is Equivalent to Footwear
बऱ्याच घरात आजही अस बोललं जातं किंवा मानलं जातं की सून ही पायातील पायताण आहे ….
खूप वाईट वाटत तेव्हा
पण खरं सांगू का वाईट वाटून घेण्यापेक्षा जरा वेगळ्या नजरेतून बघावं का असा विचार मनात आला
आणि चक्क रात्री 12 वाजता झोपेत एक कविता सुचली
(तुम्ही म्हणाल ही वेडी आहे का) हो खरंच आणि रात्रीच लिहून सुद्धा काढली
कारण सकाळपर्यंत गेली असती ना डोक्यातून
तर ती कविता सादर करते विथ कॉपी राईट सांगा हा कशी वाटली
बायको (wife) म्हणजे पायताण (footwear)
बायको म्हणजे पायताण
अस म्हणतो नवरा
पण बघितला आहे का कधी तिचा तोरा?
उन्हात अनवाणी फिरताना
पायताण च येते कामाला
तुटलेल का असेना
चटका बसू देत नाही ना तुम्हाला
काटा-कुट्याच्या वाटेवर
पायताण च देते साथ
कितीही काटे रुतले तरी
बोलत नाही अजिबात
संकटात जेव्हा असता तुम्ही नि:शस्त्र
तेव्हा ती पायताण च होते तुमचं शस्त्र
अशा किती तरी वेळी पायताण च येते कामी
तरी का समजता तुम्ही तिला बिनकामी
तुम्हीच जर समजले बायकोला पायताण
तर भविष्यात तुमच्या मुलींवरही येईल हाच मानसिक ताण
म्हणूनच म्हणते आतातरी द्या
तिला तिच्या हक्काचा मान
आतातरी द्या तिला तिच्या हक्काचा मान
कवी -अस्मिता आशिष खटावकर
वरील कवितेचे कॉपी राईट माझे आहेत