Confusion

संभ्रम | Confusion

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Confusion

नंदिता आज ऑफिस मधून घरी यायला निघाली…वाटेतून पाळणा घरातून लेकीला घेऊन घरी जायच… हा तिचा दिनक्रमच होता…कधी उशीर होणार असेल तर…वसंत घेऊन यायचा…वसंत तिचा नवरा त्याने सकाळीच तिला सांगितले…आज माझी मीटिंग आहे…तू जातांना नम्रताला शाळेतून घरी घेऊन जा…कारण आज तिची बस आली नव्हती…सकाळी जातांना वसंतने तिला शाळेत सोडले होते…नंदिता गाडी सुरु करणार तितक्यात मोबाईल व्हायब्रेट झाला…पर्स मधून फोन काढून बघते…तर पाळणा घरातून (Cradle house) जोशी काकूचा फोन…आणि किमान दहा मिस कॉल…घाबऱ्या घुबऱ्या आवाजात जोशी काकू म्हणाल्या…नंदिता..! तू नम्रताच्या शाळेत जाऊ नको…काका तिला घेऊन आले…

अग शाळेतून तिच्या बाईंचा फोन होता…तुला आणि वसंताला खूप फोन केले पण उचलला नाही म्हणाल्या…मग आम्हाला केला…

नम्रताला खूप ताप आहे म्हणाल्या… तुमचा एक नंबर त्यानीं दिला होता…म्हणून शेवटी तुम्हाला कॉल केला…

तू किती वाजेपर्यंत येतेस..? उशीर होणार असेल तर तसं सांग…? मी पटकन काकांना तिला जवळच्या भिडे डॉक्टरकडे न्यायला सांगते…नंदिताच्या लक्षात आले…तिने सरांसोबत चर्चा करतांना मोबाईल सायलेंट मोड वर टाकला होता…तो आता व्हायब्रेट झाला म्हणून पाहिला…

मनात म्हणाली…बर झाल पर्स खांद्याला होती… डिक्कीत टाकायच्या आधी…निदान त्याच व्हायब्रेशन कळल तरी…नाहीतर शाळेत गेल्यावरच कळले असते… आणि ती भानावर आली…

नंदिता म्हणाली..! काकू मी निघालेच… किती ताप आहे नम्रताला..? काकू म्हणाल्या… अग 102 च्या वर आहे…म्हणून तर मी घाबरले …तू ये… तोवर मी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते…

नवऱ्याला एक फोन करून नंदिता गाडी घेऊन निघाली…इकडे जोशी काकूंनी डोक्यावर पट्ट्या ठेवल्या…ती पोहचली…पाठोपाठ वसंत पण आले…नम्रताच अंग पण थोड थंड झाल होत…लगेच उचलून तिला डॉक्टर कडे नेल…व्हायरल आहे…दोन तीन दिवसात धावायला लागेल…डॉक्टर बोलले…

आणि नंदिताने सुटकेचा निःस्वास् सोडला…पण दोन तीन दिवस…म्हणजे पुन्हा सुट्टी…कारण ती आत्ताच आठ दिवस सुट्ट्या घेऊन पुतणीचे लग्न अटेंड करून आली होती…वसंतला अचानक ऑफिस कामासाठी दिल्लीला जावे लागले…त्यामुळे ते दोन दिवसच आधी आले…

वसंतने तिच्या मनातली घालमेल ओळखली…नंदीताचा हात हातात घेऊन…डोळ्यानेच इशारा केला…नंदिताला थोडा धीर आला…

मेडिसिन घेऊन तिघे घरी आले…नम्रता नंदिताला सोडायला तयारच नव्हती…सारखी आई…आई (Mother) करून बिलगून बसली होती…शेवटी वसंत म्हणाला नंदिता तू नम्रताला बघ…मी जेवणाच बघतो…नंदिता म्हणाली…वसंत तुम्ही बसा हिच्या जवळ मी टाकते मऊ खिचडी…आज आपणही तेच खाऊ…मला तर जेवायची इच्छाच नाही..! किती तापल होत हो अंग तीच..!

तेवढ्यात नम्रता म्हणाली…नाही मला आईच पाहिजे…आई ..! तू मला सोडून कुठे, कुठे जायचे नाही…आणि ती अजूनच बिलगली…

वसंतने तिला तिथेच बसायची खून केली…आणि तो किचन मध्ये गेला…त्याच्या लक्षात आल… आज नंदिताचा देवापाशी दिवा लावायचा राहिला…मग त्याने स्वच्छ हातपाय धुतले…देवापाशी दिवा लावला…तो फार देव (God) देव नाही करायचा…पण नंदिता खूप श्रद्धाळू होती…मग त्याने अगरबत्तीचा अंगारा घेऊन नम्रताच्या कपाळाला लावून…डोक्यावरून हात फिरवला…नंदिताला हे सगळ नवीन होत…इतर वेळी तिच्या सोबत मंदिरात गेला तर फक्त हात जोडायचा…अंगारा, तीर्थ तो कधीच घेत नव्हता…त्याची आजची कृती पाहून….लेकीच्या इतक्या तापात सुद्धा तिला हसू आले…

वसंतने खिचडी बनवली…नम्रताला जेवण देऊन औषध दिली…ती सारखी म्हणत होती…आई तू मला सोडून कुठे जाऊ नको…मग म्हणाली… आई मी उद्या शाळेत जाऊ..?

नंदिता म्हणाली..नाही बेटा..! डॉक्टर काकांनी अजून दोन दिवस आराम करायला सांगितला…

मग ती म्हणाली ..! आई मग उद्या तू सुद्धा ऑफिस मध्ये जायच नाही..? तू सुद्धा सुट्टी घे…?मला तुझी खूप आठवण येते…

आई… तुला माहित आहे…दोन वर्षापूर्वी मी आजारी पडले होते…तू मला आजी कडे सोडून गेले होते…मग मला तुझी खूप आठवण येत होती…तुला माहित आहे…किती रडली मी…

नाही ..! आता तू मला सोडून जायचे नाही म्हणजे नाही..! असच बडबडत नम्रता झोपी गेली…चार घास दोघानीही पोटात टाकले…

वरच आवरून नंदिता, वसंत आणि नम्रता जवळ येऊन बसली…तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून वसंत म्हणाला…

नंदिता..! तू जा उद्या ऑफिस मध्ये…मी बघतो नम्रताच…मला माहित आहे… तुला आता सुट्ट्या मिळणं कठीण आहे… नंदिता म्हणाली…अहो पण ती ऐकायालाच तयार नाही…भोकाड पसरून घर डोक्यावर घेईल…

वसंत म्हणाला…नंदिता..! माझ्यावर विश्वास आहे न..!

नंदिता म्हणाली…तो आहे हो..!

पण नम्रता वर नाही ना..!

तू नको काळजी करू…मी सगळ मॅनेज करतो…तू फक्त जेवण बनवून जा…बाकी बंदा हाजिर है..!

नम्रता झोपली..तू सुद्धा आराम कर…लाईट बंद करून नंदिता झोपली…तीच चित्त मात्र ठिकाणावर नव्हत… स्वतःलाच प्रश्न विचारत होती..?

लेकीला इतका ताप असून का जाते मी ऑफिस ला..? सोडूयात का नोकरी…?

आपण वसंत च्या एका पगारात घर चालवू शकू का..?

परत तीचच तिला उत्तर…नाही… नाही…कस भागेल…घरासाठी इतके लोन घेऊन ठेवले…त्याचे हप्ते…LIC चे हप्ते…मेडीक्लेम्…फोर व्हीलरचा हप्ता…नाही…हे सगळ एकाच्या पगारात भागूच शकत नाही…

आणि काटकसर करू म्हटलं तरी किती आणि काय करणार..?

तस आम्हा दोघांनाही उधळपट्टीची सवय नाही…दोघेही गरीब परिस्थितीतून वर आलोय…नाही …पुन्हा ती गरिबी माझ्या लेकीच्या वाट्याला नको यायला…आम्ही दोघांनेही खूप भोगल लहानपणी… वसंतने तर दारोदार दुध, पेपर टाकले म्हणाले…माझ्याही माहेरी काही सुबत्ता नव्हतीच…चार भावंड , आई , बाबा आणि आजी…अस सात जनांच कुटूंब…एकटे बाबा कमावते… थोडीफार आमची हौस मौज केली…पण आई, बाबा आणि आजी कायम मन मारून जगले…मग आई घरात बसून शिवणकाम शिकली…आणि तिचा थोडाफार आर्थिक हातभार होऊ लागला…

तेव्हा आई (Mother) नेहमी म्हणायची…मी चांगली शिकले असते तर मी सुद्धा नोकरी केली असती…थोडा तरी नवऱ्याचा आर्थिक भार कमी केला असता…या कपडे शिवण्यात इतके पैसे नाही मिळत…त्यात अल्टरचे कामच जास्त येतात…तेवढाच फक्त खारीचा वाटा…आई शिकली नव्हती म्हणून नोकरी करत नव्हती…नाहीतर घरची परिस्थिती बघून तिनेही हातभार लावला असताच…

नाही..! काही झाल तरी नोकरी सोडायची नाही…त्यात इतका समंजस नवरा असल्यावर तर नाहीच नाही…

वसंत बरोबर बोलतात…दहा ते तीन तिची शाळा आहे…ती आणि तू सोबतच बाहेर पडता…घरी यायला साडीतीन पावणेचार होतात…मग ती आल्यावर झोपली की साडेपाच लाच उठते…दीड ,दोन तास फक्त ती एकटी असते…ते सुद्धा स्वतःच्या नातीला सांभाळावे…इतक्या मायेने सांभाळणाऱ्या जोशी काकू कडे…त्या दोन तासासाठी नोकरी सोडणं खरच योग्य नाही…आणि आज ती लहान आहे…उद्या मोठी होईल… स्वावलंबी (selfdependent)होईल…ती कॉलेज , टुशन त्यात गुरफटून जाईल…तेव्हा तुला तुझा वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडेल…तेव्हा नोकरी सोडायचा निर्णय कधीच आणि घाईत तर मुळीच घेऊ नको…

आणि आई आता दादाकडे US ला गेली म्हणून…नाहीतर ती दोघे असतातच प्रत्येक दुःखात सावली सारखे आपल्या सोबत उभे…

मग तिला आठवल…दोन वर्षपूर्वी नम्रताला असाच खूप ताप भरला होता…आणि सुट्टी घेणे शक्यच नव्हते…त्यावेळी ती जेमतेम पाच वर्षांची होती… आई खूप बोलली त्यावेळी…म्हणाली होती…सोड ती नोकरी..?

काय करायचा तो पैसा..? लेकराचे आजारपण, दुखणी , खुपणी कशी कळत नाही ग तुम्हाला…नुसता पैस्याचा ध्यास आणि हव्यास…

तुम्हा भावंडांना बर नसेल तर..! रात्र रात्र तुमच्या शेजारी बसून काढल्या आम्ही..!

आणि तुम्ही..! एकदम बेफिकीर..!

आता मी आहे म्हणून ठीक आहे नाहीतर काय केल असत ग तू…

नम्रता झोपल्यावर…नंदिता शांत पणे आईला म्हणाली…आई तू आम्हाला बेजबाबदार अस लेबल लावले… पण आई तू खरच विचार करून सांग…मी, वसंत तुला खरच बेजबाबदार आई वडील वाटतो का..?

आई..! नम्रताला लहान असताना गोवर निघाला होता…किती त्रास द्यायची ती…मी आणि वसंत आळीपाळीने रात्र आणि दिवस एक केले…चोवीस तास फक्त दोघांच्या हाताचा पाळणा केला होता…तू सुद्धा US ला होती…खूप छान मॅनेज केल आम्ही…दोघेही आठ दिवस सुट्ट्या घेऊन बसलो होतो…वसंतची तर नवीन कंपनी होती…त्याला तर विदाऊट पे होईल याची भीती होती…पण बॉस चांगला होता…त्याने सगळ सांभाळून घेतल…

पुन्हा नंदिता भानावर आली…आता तिचे मन नोकरी करावी का करू नये या संभ्रमातून (Confusion) बाहेर आले होते…

कारण तिला कळून चुकल होत…आई कोणतीही असो …नोकरी करणारी…घरी राहणारी…गरीब…श्रीमंत…

आणि हो..!

साडी घालणारी..!

नऊ वारी..!

जीन्स…किंवा पंजाबी..!

आई आईच असते…तिच्या प्रेमात तसूभरही फरक पडत नाही…

आणि कधीच पडणार सुद्धा नाही…

स्वतःशीच म्हणाली…खरतर आम्ही नोकरी करणाऱ्या आयांची तर खूप जास्त व्यथा असते…कारण पिल्लाला बर नसेल…आणि ऑफिसला जावंच लागते…तेव्हा तिची अवस्था …आकाशात फिरणाऱ्या घारी सारखी असते…” घार फिरते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी..”…अशीच काहीशी…

इतके विचार डोक्यातून आल्यावर नंदिताला आता शांत शांत वाटू लागल..

सकाळी लवकर उठली…लेकीचा ताप पाहिला…आता अंग गार झाल होत…सकाळचा नास्ता, जेवण सगळी तयारी करून…स्वतःच आवरून निघाली… आपल्या रोजच्या मोहिमेवर…डोक्यात मात्र लेकीचे विचार…आणि लवकर घरी कसे यायला मिळेल याचाच ध्यास होता…

नोकरी सोडायचा “संभ्रम” (Confusion)

मात्र आज निकाली काढला होता

-©सौ प्रभा कृष्णा निपाणे

कल्याण

संभ्रम|Confusion हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

संभ्रम|Confusion – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share संभ्रम | Confusion

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.