पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
50 Bachchan lovers of Karad on KBC
कराड येथील आम्ही ५० बच्चन प्रेमी (50 Bachchan lovers of Karad on KBC) आज सोनी टीव्हीवर “कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati)”च्या आज च्या शोमध्ये दिसणार आहोत.
आजचा शो अतिशय महत्त्वाचा आहे. या शोसाठी या वर्षी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची तिसरी बॅच 29 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईला गेली होती. यावर्षी आज अखेर एकशे पंचवीस जणांना अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने अमिताभ बच्चन यांचे दर्शन घडवले आहे.
आम्ही सर्वजण 29 तारखेला सकाळी आठ वाजता सेटवर पोहोचलो. भेटीची एक्साइटमेंट फार मोठी होती. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आठ वाजताच सेटवर आत पाठवण्यात आले. या दिवशी शूटींग लवकरच सुरू होणार होते.
आत गेल्यानंतरचे सेटवरचे भक्तिमय वातावरण पाहून आम्हाला खूप आनंद झाला.दुर्गा स्तवन आणि बंगाली गाण्याच्या शूटिंगची तयारी सुरू होती. सुमारे दीड तास या गाण्याचे शुटिंग सुरू होते .अमिताभ बच्चन यांच्या तोंडून दुर्गा स्तवन ऐकणे हा आमच्यासाठी एक अतिशय सुंदर असा अनुभव होता.
१०.३० वाजता अमिताभ बच्चन यांचे सेटवर आगमन झाले आणि दुर्गा स्तवनचा पुढचा भाग अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आला. शूटिंग दरम्यान थोडेसे लंगडत असलेले अमिताभ बच्चन पाहून आम्हाला वाईट वाटले. पायाच्या बोटाला जखम होऊनही त्यांची कामाबाबत असणारी निष्ठा पाहून आम्ही खुप भारावून गेलो.
अमिताभ बच्चन यांच्या पायाला बोटाला काही दिवसांपूर्वी जखम झाली आहे. त्यामुळे 25 सप्टेंबर पासून पुढे काही दिवस केबीसीचे भाग शूट झाले आहेत. त्या भागामध्ये पायाच्या बोटाला बँडेज बांधल्याचे दिसत आहे.अमिताभ बच्चन यांनी ब्लेझर सूट ऐवजी पारंपारिक पोशाख परिधान केलेला आहेत.पायाला बोटाला झालेली जखम यादरम्यान शूटिंगमध्ये स्पष्ट दिसत आहे.
ब्लेझर घातला तर खाली शूज घालावे लागतील आणि पायाच्या बोटाला बॅंडेज केलेले असल्यामुळे शुज घालणे शक्य नाही.त्यामुळे पारंपारिक पोशाख घालून अमिताभ बच्चन यांनी पायामध्ये चपला घातलेल्या दिसत आहेत. तर पुढील काही भागात अमिताभ बच्चन यांनी ब्लेझर घालून सुद्धा रंग बेरंगी रंगाचे जोडे घातलेले आहेत, हे जरा विचित्र दिसत आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी फेसबुक वर FB 3084 – नीचे हरे, भूरे बूट ; और ऊपर कुछ matching वाले सूट अशी गमतीशीर पोस्ट केली आहे.
आठ ते दहा या वेळेत दुर्गा स्तवन आणि बंगाली पारंपरिक गाण्याचे शूटिंगमध्ये आम्ही आम्ही दर्शक म्हणून भाग घेतला.
अमिताभजी यांच्या आवाजातील ‘शरण्ये त्रंबके गौरी’ हे स्तवन अमिताभ यांच्यावर शुट होताना आम्ही तो आनंद लुटला. पायाच्या बोटाला जखम असूनही हा योद्धा थकलेला नव्हता. कारण शो मस्ट गो ऑन. पायाची जखम दुखत होती मात्र तरीही लंगडत लंगडत अमिताभ सेटवर आले. संपूर्ण शूटिंग पूर्ण केले. चार तासांमध्ये ते कुठेही थकलेले पाहायला मिळाले नाहीत. उलट सेटवर येताना आणि जाताना त्यांच्यामध्ये फार मोठा जोश आम्हाला पाहायला मिळाला.
शो दरम्यान 120 दर्शक सेटवर होते त्यापैकी तब्बल पन्नास जण कराडचे होते. आम्ही खूप दंगामस्ती केली. अमिताभ बच्चन यांच्या समवेत गप्पा मारल्या. अमिताभ यांनी दोन वेळा माझ्यासहीत अनेकांकडे पाहून केलेला नमस्कार अविस्मरणीय क्षण होता. हा आनंदाचा क्षण आज आपण केबीसी या भागांमध्ये पाहणार आहोत.
तर मग आपण आजचा केबीसी भाग नक्की पहा. आम्ही दिसलो की टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. टिव्हीचा फोटो काढून मला पाठवा.
सतीश वसंतराव मोरे
सतिताभ
१२ ऑक्टोंबर २०२१
कराडचे आम्ही ५० बच्चनप्रेमी केबीसीत | 50 Bachchan lovers of Karad on KBC हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
कराडचे आम्ही ५० बच्चनप्रेमी केबीसीत | 50 Bachchan lovers of Karad on KBC – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.