Discipline was in the house

घरांत अशी शिस्त होती | There was such discipline in the house

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

There was such discipline in the house

घरी आल्यावर हातपाय

धुतलेस कां..? चल उठ

आधी, तशीच बसलीयेस

घाणेरडी…!!

अगं, जेवायला बसायचं नां,

हात धुतलेस कां स्वच्छ..?

संध्याकाळ झाली, आधी

तोंड धू आणि नीट केस

विंचरून वेणी घाल…!!

तोंड पुसायचा टॉवेल

हात पुसायला घेऊ

नको गं, गलिच्छ कुठली..!!

बाथरूममधून बाहेर

येताना पाय कोरडे कर,

ओले पाय घेऊन फिरू

नको घरभर…!!

केस स्वयंपाक घरांत

नको ग विंचरू, अन्नांत

जातील…!!

शिळ्या भाताचा चमचा

ताज्या भाताला वापरू

नकोस, खराब होईल तो…

दुधाची पातेली एकदम

वरच्या खणांत गं….

फ्रीजमध्ये, खालती

नको ठेऊ…!!

वाट्टेल त्या भांड्यात दूध

नाही तापवायचं गं… !!

तुझ्या भांड्याने पाणी पी,

माझं घेऊ नकोस…!!

अगं, केस पुसायच्या

पंचाने अंग नको पुसू…!!

बेक्कार नुसती…!!!

खोकताना तोंडावर

रुमाल घे, कितीवेळा

सांगायचं आणि तो

रुमाल स्वतः धू…

बाकीच्या कपड्यात

टाकू नको धुवायला…!!

दुसऱ्याशी बोलतांना

चांगलं हातभार अंतर

ठेवून उभी रहा, थुंकी

उडते कधीकधी…!!

कशाला जाता येता

मिठ्या मारायच्या

एकमेकांना…..

घांम असतो, धूळ असते,

अंगाला ती लागेल नां..!!

कांहीतरी फ्याड एकेक,

कांय ते प्रेम लांबून करा..!!!

चप्पल घालून घरांत

आलीस, तर याद राख,

काढ आधी ती दारात…!!

खजूर खल्लास,

बी टाकून दे लगेच,

तशीच ठेवायची नाही,

तोंडातली आहे नां ती..?

नीट जेव, शीत

तळहाताला कसं

लागतं गं तुझं…?

कसं जेवत्येस..!

ताट स्वच्छ कर,

आणि पाणी घालून

ठेव, करवडेल नाहीतर..!!

तोंडात घांस असतांना

बोलू नकोस, इतकं कांय

महत्वाचं सांगायचंय..??

तात्पर्य कांय…?

तुम्हाला जर असं

वाढवलं गेलं असेल,

तुमच्यावर जर असे

संस्कार केले असतील,

तर कोरोनाची अजिबात

चिंता करू नका…

कारण आज सगळं

मेडीकल सायन्स जे

सांगतंय, ते आपल्या

पितरांनी आपल्याला

लहानपणीच शिकवलंय…

तेव्हा जाच वाटला खरा,

पण आज ह्याच सवयी

आपलं कोरोनापासून

रक्षण करतील…

तेव्हा काळजी करू नका,

जसे वागत आलायत

तसेच वागत रहा…!!!

एक शंका, आपल्या

पूर्वजांचे अस्वस्थ आत्मे

तर कोरोनाच्या रूपाने

परत आले नाहीत नां,

जगाला स्वच्छता

शिकवायला…???

नाही म्हणजे,

इंग्लंडचा राजा पण

शेकहँड करायच्या

ऐवजी नमस्कार

करतोय म्हणे…

दोन्ही हात जोडून…!!!

घरांतअशी शिस्त होती | There was such discipline in the house

घरांतअशी शिस्त होती | There was such discipline in the house – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share घरांतअशी शिस्त होती | There was such discipline in the house

You may also like

2 thoughts on “घरांत अशी शिस्त होती | There was such discipline in the house

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock