पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
A Foolish Fox | A Clever Crow and a Fox
एकदा एक कावळा झाडावर बसला होता. त्याच्या तोंडात जिलेबी होती. झाडाखालून एक कोल्हा आपल्याच नादात चालला होता. सहज म्हणून त्यानं वर पाहिलं तर, त्याला कावळा दिसला. अन कावळ्याच्या चोचीतली जिलेबी पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. काय केलं, म्हणजे ही जिलेबी आपल्याला खाता येईल याचा तो विचार करू लागला. विचार करताना त्याला जुन्या काळातली गोष्ट आठवली. गाणं आणि आपले आजोबा आठवले. तीच युक्ती करूया आणि जिलेबी खाऊया असं त्याच्या मनात आलं.
तो प्रेमानं कावळ्याला म्हणाला, ‘कावळेदादा, कावळेदादा, रंग तुमचा आहे छान, गाणं म्हणून घ्या ना. द्या सुंदर तान. मला तर असं झालंय, की कधी एकदा तुमचा गोड आवाज ऐकेन.’
आता कोल्ह्याचं हे गोड बोलणं कावळ्यानं ऐकलं. पण तो काही इसापनीतीतल्या मूर्ख कावळ्यासारखा नव्हता. त्याला कोल्ह्याची लबाडी लगेच लक्षात आली. आपल्या चोचीतली जिलेबी खाण्यासाठी कोल्ह्याची ही सारी धडपड चालू आहे हे त्याला पक्कं कळलं. तर आता करूयाच गंमत त्याची, असं म्हणत त्यानं तोंडातली जिलेबी झाडाच्या फांदीत हळूच अडकवली आणि गाण्यासाठी तो सज्ज झाला.
आता कावळा जोरात ओरडू लागला… ‘कावकाव, कावकाव.’ त्याचा बेसूर आवाज ऐकून
कोल्हा कंटाळला. जिलेबी मिळण्याऐवजी ही कर्कश काव काव ऐकायला लागतेय म्हणून त्याचा संताप झाला. पण, करणार काय?
आता जिलेबी मिळेल, मग मिळेल या आशेवर तो कावळ्याकडे पाहत होता. शेवटी कावळा त्याला म्हणाला, ‘काय कोल्हेदादा, कसं वाटतंय गाणं?’ तेव्हा कावळ्यानं आपल्याला चांगली अद्दल घडवल्याचं समजून तो गप्प बसला. कावळ्याने शांतपणे फांदीत अडकवलेली जिलेबी अलगद चोचीत धरली आणि तो लांब उडून गेला.
Moral of the Story (A Foolish Fox)
बोध
अनुभवाने शहाणे व्हा. जर कोणी तुम्हाला फसवत असेल तर सावध रहा.