पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
The Horse Learned a Well Lesson
एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते.
वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, “मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे. मला ते फारच जड होत आहे.”
घोडा म्हणाला, “जड होवो की हलके. मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस.”
घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्या मुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.
व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले.
चालता चालता घोडा मनात म्हणाला, “मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल.
Moral of the Story (The Horse Learned a Well Lesson)
बोध
दुस-यांना मदत करा.