पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Gosht Unch Kulkarniynchi….
अहो, अडचणी येतातच ना. मला साध्या दरवाजातून आत शिरायचं म्हटलं तरी त्रास होतो. घराचाही दरवाजा आठ फुटांचा करून घ्यावा लागला.’
‘कोणत्याही चारचाकी गाडीमध्ये मी ड्रायव्हिंग सीटवर बसूच शकत नाही कारण मान दुमडून घेतली तरी डोके छताला लागते.’
‘स्वयंपाकाचा ओटा. त्यावर स्वयंपाक करायचा तरी माझ्या पत्नीला खूपच खाली वाकावे लागते. म्हणून मग तिच्यासाठी खास वेगळ्य़ा उंचीचा ओटा आम्ही बनवून घेतला आहे.’
‘आम्ही मुली सामान्य आकाराच्या पलंगावर झोपू शकत नाहीत कारण कितीही केले तरी पाय पलंगाबाहेरच येतात. मग आम्हाला वेगळा पलंगही बनवून घ्यावा लागला.’
‘भारतातल्या कोणत्याही दुकानात आमच्या मापाचे जोडे मिळत नाहीत मग परदेशातूनच मागवण्याशिवाय चॉईस नसतो.’ ‘रेडिमेड कपडे सोडाच.. कपडे घ्यायचे म्हणजे ताग्यातूनच कापड घ्यावे लागते.’
पुण्यातील एका सामान्य मध्यमवर्गीय कुलकर्णी कुटुंबाचे हे अनुभव! पण जगावेगळे.कारण एकच-कुटुंबातल्या प्रत्येकाची उंची किमान सहा फुटांपेक्षा अधिक.हे सारे कुटुंबच इतके उंच असल्याने गिनीज बुकही बुचकळ्य़ात पडले आहे.त्यांचेही बरोबर आहे. आजवर एकट्या उंच माणसांचे कितीतरी विक्रम झाले;पण सगळे कुटुंबच उंच? आता या कुटुंबाची जागतिक स्तरावर विक्रम म्हणून नोंद करायची तर त्यांना स्वतंत्र श्रेणी तयार करावी लागणार आहे म्हणे.
घरातील कर्तेपुरुष असलेले शरद कुलकर्णी हे स्वत: ७.२ फूट उंच आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी संज्योत या ६.३ फूट उंच आहेत. तर त्यांची मुलगी मृगा ही ६.१ फूट आणि दुसरी मुलगी सानिया ही ६.६ फूट इतकी उंच आहे. पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात एका अपार्टमेंटमध्ये हे मराठमोळे चौकोनी कुटुंब राहते. घरात प्रवेश करतानाच वेगळेपण लक्षात येते ते दरवाजाच्या उंचीमुळे. जणू एखाद्या महाद्वारातून आपण आत जात आहोत, असाच भास त्या फ्लॅटमध्ये प्रवेश करताना होतो.
कुलकर्णी सांगतात, घरातील प्रत्येक गोष्ट आम्हाला आमच्या गरजेनुरूप करून घ्यावी लागली. आपण नकळतपणे विचारतो, मग त्यात काय काय अडचणी आल्या?ते हसत उत्तरतात,अडचणी कसल्या हो, घराचा खर्च तेवढा वाढत गेला!
मुलाखतीची वेळ ठरली त्या दिवशी कुलकर्णी इचलकरंजीहून एका दिवसासाठी कुटुंबासमवेत आले होते. संध्याकाळी ठरलेल्या वेळी मी दूरध्वनी केला तर ते म्हणाले, ‘अहो, आताची वेळ जरा आपण पुढे ढकलूयात का?. आमच्याकडे पाणी आलंय आणि मला नी बायकोला ते खाली जाऊन भरावं लागणार आहे.’ मनात म्हटलं, अरेच्चा ही माणसं उंचीवर आहेत खरी; पण यांचे पाय आपल्यासारखेच आहेत. अगदी मातीचे. जमिनीवरच टेकलेले.
सार्या कुटुंबीयांच्या वागण्याबोलण्यात कोणताही अभिनिवेश नाही. आपली उंची जास्त आहे याचे अप्रूपही नाही आणि न्यूनगंड तर त्याहून नाही. राष्ट्रीय विक्रमात नोंद झाली म्हणून बोलण्यात आढेवेढे नाहीत; पण त्याचवेळी उगीच अघळपघळपणाही नाही.
गप्पांना सुरुवात झाली. कुलकर्णी सांगत होते, ‘शाळेत असेपर्यंत मी बुटका होतो हे आज कुणाला सांगून खरेही वाटणार नाही. तेव्हा माझी उंची जेमतेम ५.३ फूट इतकी होती. मी सायकलिंग, स्विमिंग सुरू केले आणि वर्षभरात माझी उंची चक्क एक फूट वाढली. घरात आईने माझ्यासाठी घेतलेले सारे कपडे मला अचानक तोकडे झाले आणि सारे कपडे नव्याने शिवण्याची पाळी आली.
महाविद्यालयात गेलो तेव्हाही उंचीच मदतीला धावून आली. फग्यरुसनच्या बास्केटबॉल संघाकडून तेव्हा डॉ. जगदीश हिरेमठ खेळायचे. त्यांना रोखण्यासाठी आमच्या बीएमसीसीच्या संघाकडे तेवढा उंच खेळाडूच नव्हता. तेव्हा ‘चेकिंग’साठी माझी निवड झाली. उंचीचा मोठ्ठा फायदा झाला तो असा. कारण या बास्केटबॉल खेळात मी रमलो. पुढे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलो. या खेळामुळेच मला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली व माझ्या आयुष्याला दिशा आली
ही उंचीची देणगी आनुवंशिक असल्याचे कुलकर्णी मानतात. त्यांचे वडीलही सहा फुटांपेक्षा अधिक उंच होते, तर आईदेखील सहा फुटांच्या आसपास होती. ते एका लग्नात गेलेले असताना एका मित्राच्या आईची नजर पडली आणि जोडीदारणीचा शोध संपला. या उंच वरासाठी आसपास काही साजेशी वधू मिळत नव्हतीच, तेव्हा थेट मध्य प्रदेशातील खारगोड या गावातून वधू शोधावी लागली.
लग्न झाले. त्यानंतर जेव्हा हे दोघे पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरून किंवा फग्यरुसन रस्त्यावरून फिरायचे तेव्हा लोक वळून वळून पाहायचे. काही वेळा हसायचे. कधीतरी कॉमेंटही करायचे. सुरुवातीला कुलकर्णी चिडून प्रतिक्रिया द्यायचे, वाद घालायचे परंतु नंतर नंतर त्यांना लोकांना कुतुहल असते याची जाणीव झाली. त्यांनीच दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
‘रस्त्याने एखादे राजा-राणी निघाले आणि बाकी सारी प्रजा कौतुकाने पाहतेय, अशा भावनेने आम्ही रस्त्यावरून फिरू लागलो आणि मग लोकांच्या वागण्याविषयीचा आमचा राग संपून गेला.’ – ते हसत सांगतात.
वडिलांकडून आलेली उंचीची देणगी मुलींपर्यंत आली आहे. मोठी मुलगी मृगा एमबीए करते आहे. फग्यरुसन महाविद्यालयात शिकताना तिला अनेक गमतीशीर अनुभव येत; परंतु हळूहळू तीदेखील वातावरणाला सरावली. धाकटी सानिया तर आता कुठे दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे; परंतु तिची उंची मोठय़ा बहिणीपेक्षा जास्त आहे. लोक मोबाईलवर फोटो काढू लागले की, सुरुवातीला या कुटुंबाला त्रास व्हायचा; पण आता त्याकडेही दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे.
उंचीमुळे मुख्य समस्या भेडसावायची ती म्हणजे कपड्यांची. कारण मापाचे रेडिमेड कपडे घेणे सोडाच; पण ताग्यातूनच कापड घेऊन शिवून घेण्याशिवाय पर्याय नसायचा. चपला, बुटांचे जोड तर इथे कुठेच मिळायचे नाहीत. कुलकण्र्यांचे एक काका युरोपात राहत होते ते त्यांच्या मापानुसार स्पोर्टस् शूज पाठवायचे. आता मात्र ऑनलाइन शॉपिंगने काम सोपे केले आहे. हवी ती ऑर्डर ते ऑनलाइन देतात आणि परदेशातून वस्तू गरजेनुसार मागवून घेतात.
घरातील प्रत्येक गोष्ट उंची लक्षात घेऊन बनवून घ्यावी लागली आहे. अगदी टॉयलेटपासून बेडपर्यंत. फर्निचरपासून स्वयंपाकघरातील ओट्यापर्यंत. लिम्का बुकमध्ये या उंच जोडगोळीची नोंद झालीच होती आता अवघ्या कुटुंबाची नोंद गिनीज बुकात होण्याची वाट सारेच पाहत आहेत.
व. पु. काळे यांचे वेगळ्य़ा संदर्भात एक सुंदर वाक्य आहे. ते लिहितात, ‘समाजात एक विशिष्ट उंची प्राप्त करेपर्यंतच सारा संघर्ष असतो. एकदा का ती उंची गाठली की, तुमची बहुतेक कामे ती उंचीच करत असते..’ कुलकर्ण्यांच्या बाबतीत मात्र या उंचीची यथार्थता खर्या अर्थाने पटून जाते.
गोष्ट उंच कुलकर्ण्यांची …………….Gosht Unch Kulkarniynchi…. Source
गोष्ट उंच कुलकर्ण्यांची …………….Gosht Unch Kulkarniynchi…. हा लेक अवडला असल्यास शेअर करा.
गोष्ट उंच कुलकर्ण्यांची …………….Gosht Unch Kulkarniynchi…. – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “गोष्ट उंच कुलकर्ण्यांची… | Gosht Unch Kulkarnynchi….”