Broken Mirror and Broken Comb
ज्यांचं ज्यांचं वय आज
पन्नाशीत आहे
त्यांच्या स्वभावा मधे
बराच संयम आहे
कुठून आला हा संयम
एवढी नम्रता कशी ?
अपमान पचवण्याची
ताकद आली कशी ?
या प्रश्नांची उत्तरं
जरूर तुम्हाला मिळतील
जर तुम्हाला बालपणीचे
त्यांचे दिवस कळतील
दारिद्र्य आणि गरिबी
घरोघरी होती
अंग घासायला दगड
अन दाताला राखुंडी होती
कशाचं बॉडी लोशन
अन कसचं Hair gel
हिवाळ्यात अंग उललंकी
आमसुलाच तेल
तोंड पाहण्यासाठी नेहमी
फुटका आरसा असायचा
इतकुशयाक तुकड्या मधे
एकतर फक्त डोळा ,नाहीतर कान दिसायचा
सगळे दात असलेला कंगवा (Comb)
कधीही मिळाला नाही
अफगाण स्नो चा भाव आम्हाला
कधीच कळाला नाही
चड्डी अन सदऱ्याला
तांब्याची इस्त्री असायची
नेहरीला लोणच्या सोबत
शिळी भाकरी भेटायची
कबड्डी , लंगडी , कोया
फ़ुकटे खेळ असायचे
दोन्ही घुडघे फुटले तरी
पोट्टे खुश दिसायचे
कांद्याचे पोहे अन
मुरमुऱ्याचा चिवडा
पेढ्याचा टूकडा मिळालाकी
आनंद आभाळा एवढा
काजू , बदाम यांच्या बद्दल
फक्त ऐकून होतोत
एखादा पाहुणा आला की
अंगणात नाचत होतोत
मोठ्या माणसा समोर जायची
हिंमतच नसायची
वडील बैठकीत असलेकी
पोरं वसरीवर दिसायची
आजकालच्या पोरांना हे
खरं वाटणार नाही
आई वडिलांच्या गरिबीवर
विश्वास बसणार नाही
म्हणून म्हणतो पोरांनो
आई वडिलांशी बोला
काही नाही मिळालं तरी
आनंदाने डोला
नसण्यातच मजा होती
मोठं झाल्यावर कळतं
खरं शिक्षण माणसाला
गरिबी कडूनच मिळतं