पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Charoli
अवचित नाथ दिसता
मोहरून विश्व हसले
नयनात उर्मिलेच्या
अश्रू भरून आले ।
अन जानकी मिठीत
नावरे पूर अश्रूंचा
पाहते अयोध्या सारी
हा सोहळा सुखाचा ।।
०६.०१.२०२२