पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Jijamata
जिजामाता
शिवबा नि राजमाता
शब्दात कैसे वर्णू मी
त्या माय नी सुपुत्रा
आठवेन नित्य नेमी
कर्तव्य, न्याय शौर्य
सतधर्म राजनीती
श्रीराम पांडवांच्या
सांगून लाख गोष्टी
श्रीमान योगी घडविला
शिवबा महा प्रतापी
साधून गनिमी कावा
यवन खला दंडीले
जिजामाता चेतनेने
गो ब्राम्हण रक्षिले
माय शोभे मावळ्यांची
मूर्तीमंत रणधीर प्रेरणा
दयासिंधू ती रयतेची
स्वराज्य स्वप्न पाहिले
कठोर केली साधना
धन्यची शिवराय माऊली
धन्य ती वीरांगना ।।
-©पुष्पा पेंढारकर
१२.०१.२२
One thought on “जिजामाता | Jijamata”